ट्रम्प विरोध टोकाला! ट्रम्पविरोधी घोषणा देत प्रवाशाचा विमानात गोंधळ, विमान बॉम्बने उडवण्याची दिली धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे संपूर्ण जगभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेतही ट्रम्प विरोधात घोषणाबाजी सुरु आहे. त्यामुळे आता ट्रम्पविरोधातील वातावरण चांगलेच तापले असून विमानातही याचे पडसाद उमटल्य़ाचे दिसून आले आहे. लंडनच्या ल्युटन विमानतळावरून ग्लासगोला जाणाऱ्या इझीजेट एअरलाइन्सच्या विमानात एक धक्कादायक घटना घडली. येथे विमानात उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने अचानक गोंधळ घातला. या प्रवाशाने मोठ्याने आरडाओरडा करत विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. दरम्यान आता त्या व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हे विमान ग्लासगो विमानतळावर उतरले तेव्हा ट्रम्प मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्या व्यक्तीला स्कॉटलंडमधून अटक करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तो व्यक्ती ओरडताना दिसत आहे. ‘मी विमान बॉम्बने उडवून देईन. याशिवाय, व्हिडिओमध्ये तो अमेरिका मुर्दाबाद, ट्रम्प मुर्दाबाद आणि ‘अल्लाह हू अकबर’ असे ओरडतानाही दिसत आहे. त्यानंतर विमानात उपस्थित असलेल्या दुसऱ्या प्रवाशाने त्याला पकडून खाली पाडले आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

मोठ्या धोका टळला, सर्व प्रवासी सुरक्षित
विमानात गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीचे वय 41 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. सध्या या व्यक्तीची दहशतवाद विरोधी विभाग चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ग्लासगो टाईम्सच्या वृत्तानुसार, विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, कोणत्याही प्रवाशाला कोणतेही नुकसान झालेले नाही.

Comments are closed.