महात्मा गांधींची परंपरा काँग्रेसमध्ये राहिली नाही; भाजप आमदाराने काँग्रेसला डिवचले; म्हणाले, ज
वर्डा न्यूज: वर्ध्यासह विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची (BJP) विभागीय मंथन बैठक आज (28 जुलै) सेवाग्रामच्या चरखागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस विदर्भातील भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार प्रमुख उपस्थित राहणार असून, निवडणुकांसंदर्भात महत्त्वपूर्ण रणनीती आखली जाणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वर्धा जिल्ह्यात भाजपची ही बैठक होणे, विशेषतः लक्षवेधी ठरत आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अनेक मंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही उपस्थित राहणार आहेत. सेवाग्राममध्ये होणाऱ्या या मंथन बैठकीस आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच दरम्यान, वर्ध्यातील भाजप आमदार सुमीत वानखेडे (Sumit Wankhede) यांनी काँग्रेसला डिवचले आहे. “महात्मा गांधींची लेगेसी (परंपरा) काँग्रेसमध्ये आता कोणीही पुढे नेत नाही. ही परंपरा आता भाजप पुढे नेईल,” असे त्यांनी म्हटले आहे.
सुमीत वानखेडे म्हणाले की, गांधींच्या वर्ध्यात भाजपची बैठक होत आहे, यात काहीही आश्चर्य करण्याचा कारण नाही. वर्ध्यात आणि सेवाग्राममध्ये भाजपची ही पहिली बैठक नाही. यापूर्वी अनेक बैठका झालेल्या आहेत. अनेक वर्षांपासून महात्मा गांधींची जी लेगेसी काँग्रेस सांगायची, ती आता राहिलेली नाही. वर्धा जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार किंवा खासदार राहिलेला नाही, असे त्यांनी म्हटले.
जो गांधींच्या विचारांवर चालेल त्याच्याकडेच…
महात्मा गांधींची लेगेसी आता काँग्रेसकडे नाही, म्हणजे ती भाजपकडे आली आहे, असं मानायचं का? असे सुमित वानखेडे यांना विचारले असता ते म्हणाले की, अर्थातच जो गांधींच्या विचारांवर चालेल त्याच्याकडेच गांधींची लेगेसी राहील, असे म्हणत त्यांनी एका प्रकारे दावा केला की गांधीजीची लेगेसी आता भाजपकडे आली आहे. आज आमची संघटनात्मक बैठक आहे. आगामी काळासाठी भाजपचे धोरण आणि कार्यक्रम काय असावं? यावर विचार करण्यासाठीची ही बैठक आयोजित केल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.
वर्ध्यात गांधींची लेगेसी चालवणारा काँग्रेसचा कोण नेता शिल्लक?
वर्ध्यातील काही गांधीवादी संघटनांमध्ये अतीकडवट डावे सक्रीय झाले असून गांधीवाद्यांनी सावध राहावं, असे मागे तुम्ही बोलले होते, याबाबत विचारले असता सुमीत वानखेडे म्हणाले की, तो माझा आरोप नव्हता तर वर्धासंदर्भात माझी काळजी होती आणि या विषयाला ज्यांनी गांभीर्याने घ्यायचं आहे, त्यांनी त्या संदर्भात चिंता करणं सुरू केले आहे. वर्ध्यात गांधींची लेगेसी चालवणारा काँग्रेसचा कोण नेता शिल्लक आहे? कोण आमदार आहे? कोण खासदार आहे? हे सांगा. मी खोटं बोलत नाही, तर सत्य परिस्थिती सांगत आहे, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले. आता सुमीत वानखेडे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
आणखी वाचा
Pune Crime Rave Party: खडसेंच्या जावयाचा ठरवून गेम? कॉल करुन बोलावलं अन् अडकवलं; हॅकरचा सनसनाटी दावा
आणखी वाचा
Comments are closed.