पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचे वक्तव्य गांगुलीला भोवले

पाकिस्तानसोबत सामना खेळण्यास मला वैयक्तिकरीत्या कोणतीही समस्या नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताच हिंदुस्थानचा दादा माजी कर्णधार सौरभ गांगुलीला सोशल मीडियावर नेटिझन्सच्या रागाला सामोरे जावे लागले. तसेच देशभरात त्याच्याविरुद्ध टीकेचे वादळही उठले आहे. गेले काही दिवस आशिया कपमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सामना होणार असल्याची चर्चा सुरू होती आणि त्यातच दोन दिवसांपूर्वी स्पर्धेचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला. याबाबत एका मुलाखतीत गांगुलीला विचारले असताना तो म्हणाला, मला या सामन्याबाबत काहीही हरकत नाही. क्रिकेट हे चालूच असायला हवे. पहलगामसारखी घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे, पण खेळ थांबवणे हा उपाय नाही.आपण दहशतवादाचा प्रतिकार करतोय आणि त्यांना चोख प्रत्युत्तरही देतोय. मात्र अशा घटनांमुळे खेळाची चाके थांबयला नकोत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Comments are closed.