थायलंड आणि कंबोडियामधील संघर्ष थांबणार, मलेशियाच्या पंतप्रधानांची मध्यस्थी यशस्वी

थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमधील विकोपाला गेलेला संघर्ष अखेर थांबणार आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी या दोन देशांमध्ये मध्यस्थी केली असून विनाअट संघर्षविराम करण्यास दोन्ही देशांना राजी केले आहे, अशी माहिती पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी सोमवारी प्रासरमाध्यमांशी बोलताना दिली.
थायलंड आणि कंबोडिया यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत कमीत कमी 35 लोकांचा मृत्यू झाला असून तब्ब्ल 2 लाख 60 हजारांहून अधिक लोकांना आपले घर सोडावे लागले आहे. अन्वर इब्राहिम यांनी आज यासंबंधी माहिती देताना सांगितले की, दोन्ही देशांनी आपापल्या देशांतील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यासाठी पाठिंबा दिला आहे. कंबोडियाचे पंतप्रधानहुन मानेट आणि थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथाम वेचायाचाई यांनी 28 जुलैच्या मध्यरात्रीपासून तत्काळ आणि विनाअट संघर्षविराम करण्यावर सहमती दर्शवली आहे, असे पंतप्रधान इब्राहिम यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही देशांनी संघर्ष थांबवावा यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव होता.
Comments are closed.