गाझात रुग्णालयाबाहेर हल्ला, 34 जणांचा मृत्यू

गाझामधील परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. सोमवारी इस्रायलने गाझातील विविध भागांत जोरदार हवाई हल्ले केले. या हल्ल्यात 34 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती स्थानिक आरोग्य अधिकाऱयांनी दिलीय.
इस्रायलने आदल्या दिवशी गाझातील काही भागांत दररोज 10 तासांपर्यंत लष्करी कारवाई थांबवण्यात येईल, अशी घोषणा केली होती. परंतु त्याच्या दुसऱयाच दिवशी सोमवारी हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील सात महिन्यांच्या गर्भवती महिलेसह 11 लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर इस्रायलने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. इस्रायली लष्कराने रविवारी सांगितले होते की, गाझा सिटी, दीर अल-बलाह आणि मुवासीमध्ये दररोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सैन्य कारवाई करण्यात येणार नाही. परंतु सोमवारी गाझा शहरात हल्ले चढवले.
Comments are closed.