Korean Haicare Routine: आता कोरियन हेअरकेअरने घ्या केसांची काळजी
पावसाळा ऋतू सुरू झाला की त्वचा आणि केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कारण या दिवसात त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या समोर येत असतात. पावसाळ्यात केसही मोठ्या प्रमाणात गळतात. अशा वेळी काही नवीन उपाय अवलंबून तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही कोरियन हेअरकेअर रूटीन फॉलो करून तुमच्या केसांची काळजी घेऊ शकता. हे कोरियन हेअरकेअर नेमके काय असते आणि त्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया..
पावसाळ्याच्या दमट वातावरणात केस गळती, केसात चिकटपणा असणे या समस्या होतात. यासाठी कोरियन हेअरकेअर फायद्याचे असते. जगभर प्रसिद्ध असलेले हे एक हेअरकेअर रूटीन आहे.
कोरियन हेअरकेअर रूटीन म्हणजे काय?
कोरियन हेअरकेअर रूटीन हे स्टेप बाय स्टेप केले जाणारे हेअरकेअर आहे. ज्यामध्ये केसांची स्वच्छता आणि पुरेसे पोषण दिले जाते. केवळ शॅम्पू आणि कंडिशनर नव्हे तर स्कॅल्प मसाजपासून ते केस हायड्रेट करणे अशा स्टेप्स यामध्ये असतात. कोरियन हेअरकेअर रूटीनचे स्टेप्स जाणून घेऊ..
स्कॅल्प मसाज
या हेअरकेअरची सुरुवात ही स्कॅल्प मसाजपासून केली जाते. आर्द्रतेमुळे आपल्या स्कॅल्पवर तेलकटपणा येतो. केसात कोंडा होण्याचे कारण हेच असते. त्यामुळे सौम्य स्कॅल्प स्क्रब किंवा स्कॅल्प क्लीन्सरने स्वच्छता करा.
शॅम्पू
कोरियन महिला या रसायने असलेले शॅम्पू वापरात नाहीत. तर सल्फेट-मुक्त शाम्पूने केस धुतले जातात. यासाठी टी ट्री ऑइल किंवा पुदिना असलेले शॅम्पू चांगले असतात.
हायड्रेटिंग
केसांचे हायड्रेशन हा कोरियन रूटीनचा सर्वात महत्वाचा भाग आहे. केस धुतल्यानंतर, हायड्रेटिंग कंडिशनर लावा. यामुळे केस उडत नाहीत आणि आर्द्रतेचा जास्त परिणाम होत नाही. मात्र कंडिशनर केवळ केसांना लावा स्कॅल्पला लावू नये.
हेर टॉनिक
कंडिशनरनंतर, कोरियन महिला हेअर टॉनिक वापरतात जे केसांना पोषण देते. त्यात अनेकदा जिनसेंग किंवा ग्रीन टी सारखे घटक असतात जे केसांच्या वाढीस चांगले असते.
कोरियन हेअरकेअर रूटीनचे फायदे:
- केसांना मुळापासून मजबूत करते.
- रक्ताभिसरण वाढल्याने केस गळती कमी होते.
- नियमित काळजी घेतल्याने केसांची वाढ होते.
- कंडिशनिंग आणि सीरम केसांना चमक देतात.
- कोंडा कमी होतो.
घर फोलो:
हे हेअरकेअर रूटीन तुम्ही घरच्या घरी करू शकता. जसे की स्कॅल्प स्क्रबसाठी दही आणि कडुलिंब पावडर वापरू शकता. हेअर मास्कसाठी दही, मध आणि अंडी. मसाजसाठी कोकोनट आणि मेथीचे तेल. तर सीरमऐवजी कोरफड जेल वापरू शकता. आठवड्यातून एकदा निरोगी केसांसाठी हे हेअरकेअर रूटीन पाळावे.
हे टाळा:
अनेकदा आपण हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनर वापरतो. मात्र कोरियन हेअरकेअर रूटीनमध्ये हे वापरले जात नाही. केसांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या आणि हवे असल्यास सौम्य हेअर मिस्ट किंवा अँटी-फ्रिझ स्प्रे वापरा.
Comments are closed.