हरियाणात सीआरपीएफ जवान ठार

गावातील तरुणांकडून गोळीबार : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

वृत्तसंस्था/ सोनिपत

हरियाणातील सोनिपतमध्ये रविवारी रात्री उशिरा 29 वर्षीय कृष्णा नामक सीआरपीएफ जवानाची त्याच गावातील दोन तरुणांनी गोळ्या घालून हत्या केली. हे प्रकरण सोनिपत जिह्यातील खेडी दमकन गावात घडली. मृत आणि हल्लेखोर आरोपी दोघेही खेडी दमकन गावातीलच रहिवासी आहेत. मृताचे वडील बलवंत यांच्या जबाबावरून निशांत आणि अजय या दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमागील कारण परस्पर शत्रुत्व असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  घटनेची माहिती मिळताच सोनीपत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृत जवान कृष्णा हा गेल्या 11 वर्षांपासून सीआरपीएफमध्ये सेवा बजावत होता. तो अलिकडेच सुट्टीवर आला होता.

Comments are closed.