भावपूर्ण श्रद्धांजली! कलाभवन नवस हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला मल्याळम अभिनेता – Tezzbuzz
मल्याळम चित्रपट अभिनेता, मिमिक्री कलाकार कलाभवन नवस शुक्रवारी संध्याकाळी छोटानीक्कारा येथील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले. ५१ वर्षीय कलाभवन नवस एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी हॉटेलमध्ये थांबले होते, जिथे पोलिसांना त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली.
माध्यमातील वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, अभिनेता कलाभवन ज्या हॉटेलमध्ये राहत होता त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कलाभवनला हृदयविकाराचा झटका आल्याचा पोलिसांना संशय आहे.
कलाभवन नवस हे एक प्रतिभावान अभिनेते आणि मिमिक्री कलाकार होते. त्यांनी मल्याळम चित्रपटातही गायन केले आहे. मिमिक्री, अभिनय आणि गायन यासाठी प्रेक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी अभिनेते कलाभवन नवस यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘डोंट टच मी’ फेम अमेरिकन गायिका जीनी सीली यांचे निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सैयाराने मोडला कबीर सिंगचा रेकॉर्ड; जगभरात ४०० कोटी पार…
पोस्ट भावपूर्ण श्रद्धांजली! कलाभवन नवस हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला मल्याळम अभिनेता प्रथम वर दिसले डेनिक बॉम्बबॉम्ब?
Comments are closed.