सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मातोश्रींच्या लढ्याला यश, पोलिसांविरोधात गुन्हा दाखल

सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. कोर्टाने पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अखेर सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुर्यवंशी याच्या मातोश्री विजयाबाई सुर्यवंशी यांनी कोर्टात न्याय मागितला होता. सर्वोच्च न्यायालयानेही पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 2 ऑगस्ट रोजी मध्यरात्री नवा मोंढा पोलीस स्थानकात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांचेही नाव नमूद करण्यात आले आहे.

Comments are closed.