Fashion Tips: स्किन टोननुसार आऊटफिट कसे निवडावे?
अनेकदा आपण कपडे निवडताना कन्फ्युज असतो. आपल्यावर नेमका कोणता रंग शोभून दिसेल हे पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे कपडे निवडताना अडचण येते. अशावेळी तुमच्या स्किन टोननुसार आऊटफिट निवडणे योग्य ठरते. स्किन टोननुसार कपडे घालणे अनिवार्य नाही. मात्र तुमच्या स्किन टोननुसार कपडे घातल्याने तुमचा लूक अजून छान दिसतो. स्किन टोननुसार कपडे घातल्याने चेहरा अधिक ताजा आणि चमकदार दिसू शकतो. ( How to Find The Best Colors to Wear For Your Skin Tone)
आता तुमच्या त्वचेचा रंग कसा ओळखायचा हा प्रश्न आहे. तर आपला स्किन टोन ओळखण्यासाठी आपल्या मनगटावरील नसांचा रंग मदत करू शकतो. जसे की, वॉर्म स्किन टोन असलेल्या लोकांच्या नसांचा रंग हिरवा असतो. जर तुमच्या नसा निळ्या किंवा जांभळ्या दिसत असतील तर तुमचा स्किन टोन कूल असेल. तर ज्या लोकांच्या नसा हिरव्या आणि निळ्या दिसतात, त्यांचा स्किन टोन न्यूट्रल असतो.
मस्त त्वचेचा टोन
जर तुमच्या त्वचेचा रंग गोरा असेल तर निळा, गुलाबी, जांभळा, राखाडी रंगाचे कपडे तुम्हाला शोभतील. या लोकांनी जास्त ब्राईट रंगाचे आऊटफिट घालणे टाळावे.
उबदार त्वचेचा टोन
जर तुमचा त्वचेचा रंग सावळा असेल तर ऑलिव्ह, मरून, तपकिरी, सोनेरी, पीच रंग तुमच्यासाठी खूप चांगले ठरतील.या लोकांनी फिकट रंगाचे कपडे घालू नये.
तटस्थ त्वचा टोन
या स्किन टोन असलेल्या लोकांना जास्त विचार करण्याची गरज नाही, कारण प्रत्येक रंग त्यांना शोभतो. या स्किन टोन असलेले लोक न्यूड ते ब्राइट असे कोणतेही कपडे घालू शकतात.
Comments are closed.