पुण्यात ‘दादागिरी’ वाढली, मग मुख्यमंत्री काय करतायत? लोकांना वर्दीची भिती राहिलेली नाही, सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने गुन्हेगारी वाढतेय. यात पुणे जिल्हाही असून पुण्यात जी परिस्थिती आहे तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाही. वर्दीची भिती राहिलेली नाही. कोण आहे त्यांच्यामागे? सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत. याचा शोध घेण्याऐवजी राज्य सरकार मौन बाळगते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली. तसेच मुख्यमंत्री म्हणताहेत, पुण्यात दादागिरी वाढली. मग मुख्यमंत्री काय करतायत? सरकार झोपले आहे का? असा खडा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी पुण्यात दादागिरी वाढल्याने विकास खुंटल्याचे विधान केले. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गुंतवणूक येत नाहीय, हे कबूल केल्याबद्दल त्यांचे आभार. याच्यामागे कोण आहे? कोण या कंत्राटदारांच्या मागे आहे? मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना वाटत असेल पुण्यात दादागिरी होतेय, त्यामुळे पुण्यात गुंतवणूक येणार नाही, तर तुम्ही काय कारवाई केली? तुम्हाला माहितीय इथे दादागिरी होतेय, गुंतवणूक येत नाहीय, याला जबाबदार कोण? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निर्घृणपणे केलेल्या हत्येला जवळपास दोन वर्ष पूर्ण होत आहे. महादेव मुंडे यांच्या हत्याच्या तपासाकरिता उशिरा का होईना राज्य सरकारच्या वतीने एसआयटीची स्थापना करण्यात आली. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. एसआयटीच्या मार्फत करण्यात येणारा तपास पारदर्शक व्हावा अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली.

चंद्रकांतदादांना पुणेकर अजूनही कोल्हापूरचेच समजतात! अजितदादांनी डिवचले

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत. लाडकी बहीण योजनेत 4900 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. सरकारला एवढा मोठा जनादेश मिळाला आहे, पण सत्ता आणि पैसा आल्यावर गाडी कशी चुकीच्या ट्रॅकवर जाते, याचे देशातले सर्वात दुर्देवी उदाहरण म्हणजे आजचे महाराष्ट्रातल सरकार आहे, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

Comments are closed.