एखादं काम वाकडं करून परत सरळ करणारे लक्षात राहतात, कृषिमंत्री भरणे मामांच्या वक्तव्याचा भुजबळां
दत्तात्रा भारणेवरील छगन भुजबाल: विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेले माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली. तर दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांची राज्याचे नवे कृषीमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक अजब विधान केले. महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भरणे म्हणाले, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात,” असे त्यांनी म्हटले. यावरून विरोधकांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दत्तात्रय भरणे यांच्या विधानाचा अर्थ सांगितला आहे.
भरणे मामांच्या वक्तव्याचा भुजबळांनी अर्थ सांगितला
छगन भुजबळ म्हणाले की, वक्तव्याचा आपण अर्थ चुकीचा घेतो, असं माझं म्हणणं आहे. मंत्र्यांकडे लोक केव्हा येतात? काही अडचणी असतील तेव्हाच येतात. अधिकाऱ्यांकडे न्याय मिळत नाही तेव्हाच मंत्र्यांकडे लोक येतात. कधी कधी उगाचच नियमांचा किस काढला जातो. त्यामुळे काही काम होत नाही, आपण लोकांची कामं केली की त्यावेळी लोक आपली आठवण ठेवतात, असं त्यांना म्हणायचं असेल. बाकीचे काम नियमात होतात. नियमाच्या बाहेर करा, असं नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही एका अर्थाचा दुसरा अर्थ घेत जाऊ नका. कधी कधी अधिकाऱ्यांना देखील अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्या निर्णयात मंत्री, वरिष्ठ अधिकारी निर्णय घेऊन काम मार्गी लावतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर भुजबळांची प्रतिक्रिया
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यानंतर मालेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, सर्व समाजांनी समजून घेतले पाहिजे. लेफ्टनंट कर्नल सारख्या मनुष्याला देखील अटक झाली. आता ते निर्दोष आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर देखील निर्दोष आहेत. सात-आठ वर्ष जेलमध्ये राहणं, लोकांनी कमीपणाने पाहणे. स्वतःचं आयुष्य तुरुंगात फुकट जाणं, त्याचा मनात मनस्ताप होतो. जे लोक तुरुंगात राहिले त्यांना काय भरपाई देणार? अशा वेळेला कोणत्याही धर्माचा प्रश्न नाही. कोर्टाने प्रत्येक पानाचा वर्षानुवर्षे अभ्यास केला. ज्या लोकांना पकडलं होतं त्यांना कोर्टाने न्याय दिला आहे. न्याय देवतेवर विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे कोणी जल्लोष किंवा दुःख अथवा राग व्यक्त करायचं काहीही कारण नाही. सामाजिक वातावरण बिघडवण्याचं कारण नाही, असे त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.