बुमराह तेंडुलकर, तर सिराज कोण? माजी भारतीय प्रशिक्षकाने ‘या’ महान खेळाडूशी केली मोहम्मद सिराजची तुलना

मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) (44 षटकात 86 धावांत 4 विकेट्स) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasiddh Krishna) (22.5 षटकात 62 धावांत 4 विकेट्स) यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव 247 धावांत आटोपला. त्यानंतर भारताने पाचव्या आणि शेवटच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी स्टंप्सपर्यंत दुसऱ्या डावात 2 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा करत 52 धावांची आघाडी घेतली आहे.

सलामीवीर यशस्वी जयस्वाल 51 धावांवर, तर आकाश दीप 4 धावांवर नाबाद आहेत. जयस्वालने आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडची 23 धावांची आघाडी काही वेळातच संपवली. आता तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज मोठी खेळी करत आघाडी 250 च्या पुढे नेण्याचा प्रयत्न करतील.

दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा केला, विशेषतः मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी एकूण 8 विकेट मिळवत इंग्लंडला गुडघे टेकायला भाग पाडलं. सिराजच्या या कामगिरीनंतर माजी प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay bangar) यांनी एक मोठं विधान केलं आहे, त्यांनी सिराजची तुलना थेट ‘द वॉल’ राहुल द्रविडशी (Rahul Dravid) केली आहे.

संजयग्ग्न बंगूर म्हणाले की जेव्हा ते एस्पान क्रिकिनफोशी बोलले,
हे अगदी तसंच आहे जसं की जेव्हा सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड एकत्र खेळायचे, तेव्हा सगळं लक्ष सचिनकडे जायचं, पण द्रविड शांतपणे आपली जबाबदारी पार पाडायचा. त्याचप्रमाणे जेव्हा बुमराह आणि सिराज एकत्र खेळतात, तेव्हाही तशीच परिस्थिती असते.

सिराजबाबत बोलताना संजय बांगर पुढे म्हणाले,
सिराजसाठी कार्यभार (वर्कलोड) फारसं महत्त्वाचं नसावं. सुदैवाने, बुमराहसारख्या गंभीर दुखापती त्याला झालेल्या नाहीत. कारण त्याची बॉलिंग ॲक्शन अधिक पारंपरिक आहे. तो आपल्या रन-अपमधून निर्माण होणाऱ्या वेगावर अवलंबून असतो, ज्यामुळे त्याच्या शरीरावर फार ताण पडत नाही. याउलट बुमराहची ॲक्शन पूर्णपणे वेगळी आहे.

Comments are closed.