IND vs ENG: रोहित शर्मा ओवलवर टीम इंडियाला सपोर्ट करायला उपस्थित, व्हिडीओ व्हायरल

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना 31 जुलैपासून ओव्हल येथे सुरू झाला आहे. 2 ऑगस्ट हा या सामन्याचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने 2 खेळाडू गमावले होते. तिसरा दिवस भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. अशा वेळी भारताचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील टीम इंडियाला (Team india) समर्थन देण्यासाठी ओव्हलला पोहोचला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ही मालिका 2-2 ने बरोबरीत आणण्यासाठी भारतासाठी ओव्हल कसोटी सामना जिंकणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे भारतीय संघ सर्व ताकदीनिशी खेळत आहे. तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा देखील ओव्हलमध्ये पोहोचला. तो मैदानात टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी आला होता. लक्षात घ्या की रोहित शर्माने या कसोटी मालिकेआधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

भारताने पहिल्या डावात 224 धावा केल्या, त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 247 धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली आहे. यशस्वी जयस्वाल आणि आकाश डीपी यांनी शानदार कामगिरी करत भारताला चांगली आघाडी मिळवून दिलेली आहे.

भारतीय संघ हा दिवस आपल्या नावावर करायचा प्रयत्न करेल आणि इंग्लंडसमोर मोठं लक्ष्य ठेवण्याचा निर्धार केला आहे. शुबमन गिल, करुण नायर, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांची फलंदाजी अजून बाकी आहे. आतापर्यंत झालेल्या चार कसोटी सामन्यांपैकी इंग्लंडने दोन सामने जिंकले आहेत, भारताने एक सामना जिंकला असून मँचेस्टरमध्ये झालेला चौथा सामना अनिर्णीत (ड्रॉ) राहिला होता.

Comments are closed.