दारूसाठी पैसे न दिल्याने मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला; जखमी तरुण तसाच दवाखान्यात

जलना गुन्हा: जालना शहरात दारूच्या पैशावरून झालेल्या वादात एका मित्राने थेट दुसऱ्याच्या डोक्यात चाकू खुपसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जखमी तरुण शौकत शेख डोक्यात चाकू अडकलेल्या अवस्थेत थेट जिल्हा रुग्णालयात दाखल झाला.नूतन वसाहत परिसरात शनिवारी दुपारी ही घटना घडली. शौकत आणि त्याचा मित्र पांडुरंग थोरात दारू पित असताना पैशांवरून वाद झाला. संतापलेल्या पांडुरंगने चाकू काढून शौकतच्या डोक्यात खुपसला आणि पळ काढला. जखमी शौकतने स्वतः हॉस्पिटल गाठत जीव वाचवला. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून चाकू बाहेर काढला. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून आरोपी पांडुरंगचा पोलीस शोध घेत आहेत. (Crime News)

शौकत शेख (वय ३५) असं या जखमी तरुणाचं नाव असून, त्याच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करून त्याच्या डोक्यातून चाकू बाहेर काढला असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्राथमिक माहितीनुसार, शौकत शेख आणि त्याचा मित्र पांडुरंग थोरात हे दोघं एकत्र बसून दारू पित होते. दरम्यान, दारूसाठी पैसे देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याच रागातून पांडुरंगने चाकू काढून थेट शौकतच्या डोक्यात खुपसला. डोक्यात चाकू अडकलेल्या अवस्थेत स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहचला. शौकत शेख याने दिलेल्या जबाबात या हल्ल्याची माहिती स्पष्ट केली आहे. यावर बोलताना जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर शेख साबीर यांनी सांगितले, की “रुग्णाची स्थिती गंभीर होती. डोक्यात खोलवर चाकू घुसलेला होता. आमच्या टीमने वेळेवर  आपत्कालिक विभागात काढून घेतला . तरुणाला ॲडमीट करून घेतलं आहे . त्याची प्रकृती स्थिर आहे .

दरम्यान, या प्रकरणी आरोपी पांडुरंग थोरात फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे जालना शहरात खळबळ उडाली असून. स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी

अमरावती जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीत थेट ग्रामपंचायत कार्यालयातच फ्रीस्टाईल हाणामारीचा थरार पाहायला मिळाला. महिला सरपंच पद्मा मेसकर आणि ग्रामपंचायत सदस्य राजू उल्ले यांच्यात जागेच्या वादावरून जोरदार बाचाबाची झाली आणि पाहता पाहता वातावरण तापलं. वाद एवढा पेटला की महिला सरपंचाने थेट सदस्याच्या कानशिलात लगावली. यानंतर सदस्यानेही प्रतिउत्तर दिलं आणि दोघांमध्ये अक्षरशः धक्काबुक्की सुरू झाली. या संपूर्ण घटनेचं थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.