Nashik News – इगतपुरीजवळ धावत्या कामयानी एक्स्प्रेसच्या इंजिनला आग, प्रवाशांमध्ये घबराट

धावत्या कामयानी एक्स्प्रेसच्या इंजिनला आग लागल्याची घटना नाशिकमध्ये इगतपुरीजवळ घडली. इंजिनला आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. आगीमुळे एक्स्प्रेस तातडीने इगतपुरीजवळ थांबवण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वेचे कर्मचारी, अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीहून मुंबईकडे ही कामयानी एक्स्प्रेस येत होती. यादरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनला अचानक आग लागल्याने एक्स्प्रेस इगतपुरीजवळ थांबवण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यानी तात्काळ घटनास्थळ गाठक आग विझवली. एक्स्प्रेस सध्या इगतपुरीजवळच उभी आहे. या घटनेमुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.
दरम्यान इंजिनमधून धूर निघताना पाहून एक्स्प्रेस थांबताच काही प्रवाशांनी ट्रॅकवर उड्या घेतल्या. आगीवर नियंत्रण मिळवताच प्रवाशांनी सुटेकचा निःश्वास सोडला. एक्स्प्रेस एकाच ठिकाणी उभी असल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
Comments are closed.