ऋषभ पंत बाहेर? बुमराहवर मोठा सस्पेन्स! आशिया कपपूर्वी टीम इंडियात होणार उलथापालथ? ‘ही’ प्लेइंग-

टीम इंडिया बहुधा आशिया चषक 2025 साठी 11 खेळत आहे: अशिया कप 2025 च्या आयोजनाची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच एसीसीने (Asian Cricket Council) केली. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पाहता ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शेवटी बीसीसीआयच्या (BCCI) सक्रिय सहभागामुळे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. हा हंगाम 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान भारताच्या यजमानपदाखाली, मात्र यूएईमध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेचं स्वरूप टी-20 असणार आहे, कारण 2026 मध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे.

यंदा अशिया कप 2025 मध्ये एकूण 8 संघ सहभागी होतील, जे दोन गटांत विभागले गेले आहेत.

गट 1 : भारत, पाकिस्तान, यूएई, ओमान
गट 2 : श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान, नेपाळ

भारताची प्लेइंग 11 कशी असू शकते?

भारताकडे टी-20 फॉर्मेटसाठी अनेक स्फोटक खेळाडू उपलब्ध आहेत, मात्र अंतिम संघ निवड अजून बाकी आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी अकरा खेळाडू निवडणं सहज सोपं नाही. सलामीसाठी यशस्वी जैस्वाल किंवा अभिषेक शर्मा यांच्यात एकाची निवड होण्याची शक्यता आहे. दोघेही डावखुरे आणि आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. अभिषेक शर्मा अलीकडच्या काळात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सातत्याने ओपनिंग करत असल्यामुळे त्याला थोडं प्राधान्य मिळू शकतं. दुसऱ्या सलामीवीर म्हणून संजू सॅमसन हा प्रमुख दावेदार ठरतो. तो फलंदाजीसह यष्टिरक्षणाची जबाबदारीही निभावू शकतो.

मधल्या फळीत तिसऱ्या नंबरवर श्रेयस अय्यर खेळू शकतो, जो यूएईच्या खेळपट्ट्यांवर फिरकीविरुद्ध चांगली कामगिरी करू शकतो. कर्णधार सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर येईल, याच स्थानावरून त्याची फिनिशर म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

गोलंदाजी आणि ऑलराउंडर विभाग

मधल्या फळीत अष्टपैलू हार्दिक पंड्यासह रिंकू सिंग किंवा रियान पराग यांची निवड होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर त्याच्यासोबत फिरकी गोलंदाज अक्षर पटेल आणि स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती असू शकतात. याशिवाय, कुलदीप यादव देखील स्पेशालिस्ट स्पिनर म्हणून एक चांगला पर्याय ठरू शकतो आणि त्याला प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट केले जाण्याची अपेक्षा आहे. अर्शदीप आणि हर्षित राणा हे दोन स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज म्हणून चांगले पर्याय असतील. जर बुमराह खेळला नाही तर हर्षितचा दावा अधिक मजबूत होईल.

ऋषभ पंत बाहेर? बुमराहवर मोठा सस्पेन्स!

ऋषभ पंत इंग्लंड दौऱ्यात फ्रॅक्चरमुळे दुखापतग्रस्त झाला आहे, त्यामुळे त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. बुमराहला ओव्हल टेस्टदरम्यान संघातून अचानक वगळण्यात आलं. यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बुमराह फिट असल्यास त्याचं स्थान निश्चित, अन्यथा हर्षित एक चांगला पर्याय ठरू शकतो

आशिया कप 2025 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

यशस्वी जैस्वाल / अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग / रियान पराग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षित राणा / जसप्रीत बुमराह.

हे ही वाचा –

Yashasvi Jaiswal Celebration : यशस्वी जैस्वालचं शतक, अनोख्या सेलिब्रेशननं गाजवले मैदानावर, कोणाला दिला ‘फ्लाईंग किस’? VIDEO तुफान व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.