शोकसागरात बुडाले क्रिकेटविश्व; 22 वर्षीय खेळाडूचा मृत्यू, जिममध्ये आला हृदयविकाराचा झटका

बंगाल क्रिकेटर प्रियजित घोष न्यूज: क्रिकेट विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. बंगालचा उदयोन्मुख क्रिकेटपटू प्रियजीत घोष याचे शुक्रवारी (2 ऑगस्ट) हृदयविकाराने निधन झाले. प्रियजीत घोष फक्त 22 वर्षांचा होता. शुक्रवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना त्याला हार्ट अटॅक आला, ज्यामुळे त्याचे निधन झाले. त्याच्या अचानक झालेल्या निधनामुळे मित्रपरिवार, कुटुंब आणि संघातील सहकारी खेळाडूंना भावनिक धक्का बसला आहेत. ज्यामुळे बंगाल क्रिकेट शोकसागरात बुडाले आहे.

भारतीय संघासाठी खेळण्याचे स्वप्न अधुरे…..

प्रियजीत घोष हा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्याच्या बोलपुर येथील राहत होता. त्यांचे स्वप्न सर्वप्रथम बंगाल रणजी संघात स्थान मिळवण्याचे होते आणि नंतर देशातील घरेलू क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करून भारतीय संघासाठी खेळण्याची इच्छा होती. क्रिकेट हे त्यांच्यासाठी फक्त खेळ नव्हता तर त्याची दिनचर्या होती.

प्रियजीत घोष याने क्रिकेटचा प्रवास जिल्हा स्तरावर सुरू केला होता. 2018-19 हंगामात तो इंटर डिस्ट्रिक्ट अंडर-16 क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरला होता. ही स्पर्धा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) आयोजित करते. त्याच्या या कामगिरीसाठी CAB ने त्याचा सन्मान केला होता आणि मिळालेला मेडल अजूनही त्याच्या खोलीत जपून ठेवलेला आहे.

जिम करत असताना 22 वर्षीय खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

प्रियजीत बोलपुरमधील मिशन कॉम्पाउंड भागातील एका जिममध्ये व्यायामासाठी गेला होता. भारतीय संघाच्या दिग्गज फलंदाज विराट कोहलीप्रमाणे फिटनेसकडे त्याचे खूप लक्ष होते. जिममध्ये व्यायाम करताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका झाला. त्वरित त्याला रुग्णालयात नेले गेले, पण वेळेपूर्वी उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. प्रियजीत घोषच्या अकस्मात निधनाने क्रिकेट विश्वात मोठा शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा –

Saina Nehwal- Parupalli Kashyap : क्षणभर दुरावलं, पण नातं तुटलं नाही! घटस्फोटनंतर 20 दिवसांत सायना नेहवालचा यू-टर्न, पती पारुपल्ली कश्यपसोबत केलं ‘पॅच-अप’

Team India Asia Cup 2025 : ऋषभ पंत बाहेर? बुमराहवर मोठा सस्पेन्स! आशिया कपपूर्वी टीम इंडियात होणार उलथापालथ? ‘ही’ प्लेइंग-11 चर्चेत, कोण कर्णधार?

आणखी वाचा

Comments are closed.