भारत आणि रशियाच्या तेलाच्या व्यापारावर अमेरिकेला आक्षेप का? रशियाकडून भारत काय काय खरेदी करतो?
नवी दिल्ली : भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करत आहे. मात्र, पाश्चिमात्य देशांना व्यापारी आणि राजनैतिक कारणांमुळं आक्षेप आहेत. अमेरिकेनं भारतानं रशियाकडून तेल खरेदी बंद करावी असा इशारा दिला आहे. अमेरिका आणि त्यांचे सहयोगी देश रशियाची अर्थव्यवस्था कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी रशियाच्या तेल आणि गॅस विक्रीवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करत आहे. भारतानं रशियाकडून खरेदी थांबवली नाही तर 25 टक्क्यांच्या टॅरिफ सह दंड आकारण्याचा इशारा अमेरिकेनं दिला आहे. मात्र, भारतानं स्पष्ट केलंय की आमच्या देशाचं ऊर्जा धोरण राष्ट्रीय हित आणि बाजाराची ताकद याच्या आधारावर ठरवेल. कोणत्याही बाहेरच्या दबावात येणार नाही.
भारत आणि रशियात गेल्या अनेक दशकांपासून मैत्रीचे संबंध आहेत. दोन्ही देशांचे व्यापारी आणि राजनैतिक संबंध देखील चांगले आहेत. 2022 मध्ये रशिया आणि युक्रेन युद्ध प्रारंभ करा झाल्यानंतर भारतानं रशियाकडून तेल खरेदी वाढवली आहे. भारत आणि चीन हे दोन देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतात. दोन्ही देशांना रशियाकडून कमी दरात तेल मिळत आहे. जर भारतानं रशियाकडून तेल खरेदी केली नाही तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात. रशियाकडून तेल खरेदी थांबवल्यास तेल आणि गॅसच्या देशांतर्गत शोध आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक वाढवावी लागेल.
भारत रशियाकडून काय काय खरेदी करतो?
क्रूड ऑईल
रशिया भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार देश आहे. भारत एकूण आयातीपैकी 38-40 टक्के तेलाची आयात करतो. 2024-25 मध्ये भारतानं एकूण आयातीपैकी रशियाकडून 35-39 टक्के आयात रशियाकडून केली होती. मध्ये महिन्यात भारतानं रशियाकडून प्रतिदिन 1.96 दशलक्ष बॅरल तेल आयात केली होती. हा गेल्या 10 महिन्यातील उच्चांक असे.
कोळसा
भारतानं रशियाकडून 2023 मध्ये 10.06 दशलक्ष मेट्रिक टन थर्मल कोळसा आयात केला होता. एकूण आयातीपैकी तर 6 टक्के होता. भारताच्या ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रासाठी तो महत्त्वाचा होता.
शस्त्र आणि संरक्षण उपकरण
गेल्या दोन दशकांमध्ये भारतानं रशियाकडून 40 अब्ज डॉलर्सची खरेदी केली होती. यामध्ये एस -400 हवाई संरक्षण सिस्टीम, टँकलढाऊ विमानं, युद्धनौका आणि पाणबुड्यांचा समावेश आहे.
रासायनिक ग्राहक
रशियाला भारताला मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते ज्यामध्ये युरिया आणि इतर नायट्रोजन आधारित खत याचा पुरवठा करतो. भारताच्या कृषी क्षेत्रासाठी ते आवश्यक आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफची अंमलबजावणी करण्यास 7 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.