सतर्कता विभागाने भाजपचे नेते गिल यांच्या सभागृहावर छापा टाकला

चंदीगड :

पंजाब दक्षता विभागाने अकाली दलाचे माजी नेते आणि प्रमुख रियल इस्टेट व्यावसायिक रंजीत सिंह गिल यांच्या ठिकाणांवर शनिवारी छापे टाकले आहेत. गिल यांनी शुक्रवारीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या शासकीय निवासस्थानी गिल यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले होते.

तर पंजाबच्या दक्षता विभागाने चंदीगड येथील गिल यांच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत. या कारवाईविषयी विभागाने अद्याप कुठलीही अधिक माहिती देणे टाळले आहे. गिल यांनी अलिकडेच शिरोमणी अकाली दलाला रामराम ठोकला होता. गिल हे शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. 2017 आणि 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांनी खरड मतदारसंघात निवडणूक लढविली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. गिल यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पक्षाची धोरणे आणि कार्यक्रमांबद्दल विश्वास व्यक्त केला होता.

 

Comments are closed.