‘आम्हाला हातही लावू नका, तुम्हाला पप्पा म्हणायलाही…’, 22 पानांची चिठ्ठी लिहून भाऊ-बहिणीने जीव
गाझियाबाद: गाझियाबादमध्ये एका गुप्तचर ब्युरो (IB) अधिकाऱ्याचे आणि त्याच्या बहिणीचे मृतदेह बंद खोलीत आढळले. वडील CSIR गोव्यात तैनात आहेत, भाऊ आणि बहीण आईसोबत राहत होते. घटनेच्या वेळी आई बाहेर गेली होती. ती परत आली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. तिने गेट वाजवला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिने खिडकीतून पाहिले तर दोघेही जमिनीवर पडलेले होते. शेजाऱ्याच्या मदतीने ती दार तोडून खोलीत गेली. तिने दोघांनाही रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. मृतदेहातून सल्फोसची दुर्गंधी येत होती. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. ही घटना गुरुवारी संध्याकाळी कविनगर पोलिस स्टेशन परिसरातील गोविंदपुरम येथे घडली.
भाऊ दिल्लीत काम करत होता, तर बहीण शिक्षण घेत होती
गोविंदपुरम कॉलनीतील घर क्रमांक एच-३५२ येथील सुखबीर सिंग यांचा मुलगा अविनाश कुमार सिंग आयबी दिल्लीत काम करत होता. बहीण अंजली (23) शिक्षण घेत होती. गुरुवारी संध्याकाळी उशिरा दोघेही घराच्या एका खोलीत मृतावस्थेत आढळले. त्यांची आई संध्याकाळी 5 वाजता घरी पोहोचली. खोली आतून बंद होती. सुरुवातीला आईने दोघांनाही त्यांच्या फोनवर फोन केला, पण फोन आला नाही. तिला वाटले की दोघेही झोपले असतील. यानंतर तिने खिडकीतून डोकावले आणि त्यांना दोघेही जमिनीवर पडलेले दिसले. त्यानंतर तिने शेजाऱ्याला फोन केला. एका वेल्डरला बोलावण्यात आले. त्याने दरवाजा तोडून दोघांनाही बाहेर काढले. दोघांनाही ताबडतोब सर्वोदय रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
आपलं जीवन संपवण्यापूर्वी अंजलीने डायरीच्या 22 पानांवर सुसाईड नोट लिहिली असल्याची माहिती समोर आली होती. अंजलीने
सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की आमच्या मृत्यूसाठी मिस रितू (सावत्र आई) आणि सुखवीर सिंग (वडील) वगळता दुसरे कोणीही जबाबदार नाही. महिम (मित्र) माझ्या खात्यातील पैसे आणि पीएफचा मालक असेल आणि मिस रितू आणि सुखवीर सिंग यांनी माझ्या चितेला हात देखील लावू नये. फक्त महिम मला अग्नी देईल. अंजलीने सुसाईड नोटच्या पानांचा फोटो तिचे वडील सुखवीर सिंग, सावत्र आई, मामा अनिल सिंग आणि मामी रेखा राणी यांना व्हॉट्सअॅपवर पाठवले आहेत.
अंजली सुसाईड नोटमध्ये म्हणतेय, सामाजिक रीतिरिवाज आणि आपल्या शानसाठी वडील सुखवीर सिंग आणि आई रितू तिला मानसिक त्रास देत होते. रितू देवीच्या हुशारीसमोर सुखवीर सिंग यांना कुठलेली स्पष्टीकरण देण्याचा काही अर्थ नाही. कारण, वडील सावत्र आईवर विश्वास ठेवतात. एखाद्या मुलाला फक्त जन्म देणे आणि त्यांच्या शाळेची फी भरणेच नाही तर त्याच्यासोबत वेळ घालवणे, त्याच्या इच्छा पूर्ण करणे, त्यांना समजून घेणे देखील आवश्यक आहे बाबा… माझ्या भावाला मोठ्या परिश्रमानंतर सरकारी नोकरी लागली होती. त्याचे इतके शोषण झाले आहे की तो त्याच्या मित्रांसोबत बाहेरही जाऊ शकत नाही. सुखवीर सिंग, मला तुम्हाला बाबा म्हणायलाही आवडत नाही. तुम्हाला आमच्या मृतदेहाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी तुमच्या स्वतःच्या मुलांच्या आनंदाचा गळा दाबलात. तुमच्या पत्नीचे रितूचे अभिनंदन. आईशिवाय जगणं खूप दुर्दैवी आहे. तुम्ही लोक नातेवाईक आहात पण आजपर्यंत तुम्हाला आमच्या स्थितीबद्दल माहिती नाही, असं तिने मामा देवेंद्र आणि मामा अनिल यांच्यासाठी लिहलं आहे.
डायरीची पाने फाडू नका, मी सर्वांना फोटो पाठवलेत
अंजली पुढे तिच्या सावत्र आईला सांगते की, हुशारीने पाने फाडु नका, मी त्याचे फोटो सर्वांना पाठवले आहेत. याआधी तिच्या याच सावत्र आईने तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले, तिची बदनामी केली आणि माझे वडील त्यावेळी गप्प राहिले, त्यांनी माझं ऐकलं नाही. काही लोक म्हणतील की मी वाईट आहे आणि मी माझ्या आई वडिलांबाबत अशा गोष्टी सांगत आहे. मला माहित आहे की मी माझ्या सावत्र आईसोबत 16 वर्षे कशी घालवली आहेत. माझ्या भावालाही तेच दुःख आहे. पुढे ती लिहते मला तुमच्या फसवणुकीची आणि हुशारीची जाणीव आहे. म्हणून डायरीत लिहिलेली पाने फाडू नका. कारण मी त्यांचा फोटो काढून अनेक लोकांना पाठवला आहे. तुमची हुशारी पकडली जाईल. जर मी एकटीच मेली असती तर माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते. त्यामुळे आम्ही दोघेही भाऊ आणि बहीण मानसिक तणावाखाली आहोत. आता तुम्ही समाजात मान उंचावून जगून दाखवा, असंही पुढे अंजली म्हणते.
अविनाश, अंजलीच्या आईचाही विषारी पदार्थ खाऊन मृत्यू
अविनाश, अंजलीच्या मामाने देवेंद्र यांनी कवीनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. अविनाश आणि अंजलीची आई कमलेश यांचाही विषारी पदार्थ खाऊन मृत्यू झाल्याचा आरोप देवेंद्र सिंह यांनी केलाय. पत्नीच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर, त्यांच्या वडिलांनी त्यांच्या प्रेयसीशी लग्न केले आणि तिला घरी आणले. त्यांनी अविनाश आणि अंजलीचे शोषण करण्यास सुरुवात केली. या गोष्टीला कंटाळून दोन्ही भावंडे इंदिरापुरम येथील त्यांच्या मावशीच्या घरी गेली आणि तिथे राहू लागली. देवेंद्र सिंह यांनी कवीनगर पोलिस ठाण्यात मृतकाच्या वडिलांवर आणि सावत्र आईवर त्यांच्या मुलांना जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.