42 वेळा मुलीने नकार दिला, पण पठ्ठ्याने हिंमत सोडली नाही

प्रेमात मुलं उतावीळपणा करतात आणि प्रपोज करतात. मुली मात्र प्रपोजवर विचारपूर्वक निर्णय घेतात. त्यामुळे बऱ्याचदा मुलांना नकार मिळतो. नकारानंतर क्वचित पुणी त्या मुलीला परत प्रपोज करत असेल. एका पठ्ठ्याने मात्र मुलीचे 42 नकार पचवले, पण हिंमत सोडली नाही. प्रत्येक वेळी रिजेक्शन येऊनही आशा कायम ठेवली. 43 व्या वेळी मात्र त्याने अशा पद्धतीने प्रपोज केले की, मुलगी तयार झाली आणि हॅप्पी एंडिंग झाले.

हे अनोखे जोडपे ब्रिटनमधील आहे. ल्यूक विंट्रीप नावाच्या या इसमाने गर्लफ्रेंड सारा हिला सात वर्षांत 42 वेळा प्रपोज केले. साराला ल्यूक आवडत होता. मात्र तिला कोणतीही घाई करायची नव्हती. ल्यूक सारासमोर गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, हे जगाचे सेंटर आहे व तू माझ्या जगाचे सेंटर आहेस. तू माझ्याशी लग्न करशील. या वेळी मात्र साराने त्याला होकार दिला आणि दोघांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.

Comments are closed.