जरी चर्चा सुरु असली तरी टॅरिफ कमी होणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाचा इशारा
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 पूर्वीच कॅनडा, ब्राझील, भारत, तैवान,स्वित्झरलँडवर नवे टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे व्यापारी प्रतिनिधी जेमिसन ग्रीर यांनी रविवारी स्पष्ट केलं की ज्या देशांवर टॅरिफ लादलं आहे त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही.
टॅरिफचे दर बदलणार नाहीत: जेमिसन ग्रीर
अमेरिकेतील वृत्तवाहिनी सीबीएसच्या रिपोर्टनुसार जेमिसन ग्रीर यांनी म्हटलं की जरी काही देशांसोबत व्यापारी करारावर चर्चा सुरु असल्या तरी जे टॅरिफ फिक्स केले असेल ते कायम राहील. डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर 35 टक्के, ब्राझील 50 टक्के, भारतावर 25 टक्के, तैवानवर 20 आणि स्वित्झरलँडवर 39 टक्के टॅरिफ लादलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला ट्रम्प यांनी मृत अर्थव्यवस्था म्हटलं आहे. भारताच्या भूमिकेनुसार अमेरिकेसोबत व्यापारी कराराबाबत चर्चा सुरु आहेत. अमेरिकेचं शिष्टमंडळ या महिन्यात भारताचा दौरा करतील, अशी शक्यता आहे.
करारानुसार टॅरिफचे दर निश्चित
डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय जेमिसन ग्रीर यांना विचारण्यात आलं की 70 देशांवर टॅरिफचे दर वाढवण्यात आले आहेत. येत्या काळात त्यांना टॅरिफच्या दरावर चर्चा करुन त्यात कपात केली जाईल का असा सवाल विचारला? यावर जैमिसन ग्रीर यांनी नाही येत्या दिवसांमध्ये असा निर्णय होणार नाही. आता जे दर निश्चित करण्यात आले ते समझोत्यानुसार करण्यात आलेले आहेत. काही देशांच्या मंत्र्यांना माझ्याशी चर्चा करायची आहे, ते अमेरिकेसोबत वेगळ्या पद्धतीनं काम करु शकते, असं ग्रीर यांनी म्हटलं.
चीनसोबत सकारात्मक चर्चा
जेमिसन ग्रीर म्हणाले की अलीकडच्या काळात चीनसोबत व्यापारी कराराबाबत सकारात्मक चर्चा केली आहे. ते म्हणाले की आम्ही कर्मचारी पातळीवर, माझ्या पातळीवर याशिवाय राष्ट्रपती शी जिनपिंग आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली. आम्ही कात्री तांत्रिक मुद्यांवर काम करत आहोत, असं जैमिसन ग्रीर म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.