तेजशवी यादव दोन 'मतदार कार्ड' प्रकरणांमध्ये अडचणीत सापडले
निवडणूक आयोगाकडून नोटीस : स्पष्टीकरण द्यावे लागणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने रविवारी बिहारमधील राजद नेते तेजस्वी यादव यांना नोटीस जारी केली आहे. तेजस्वी यादव यांच्याकडे कथित स्वरुपात दोन वेगवेगळे ईपीआयसी क्रमांक आढळून आले आहेत. हे क्रमांक आरएबी0456228 आणि आरएबी2916120 आहेत. ईपीआयसी क्रमांक आरएबी2916120 याचा उल्लेख तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत करत मतदारयादीत स्वत:चे नाव नसल्याचा दावा केला होता. तर आयोगाने मतदारयादीत तेजस्वी यादव यांचे नाव असल्याचे निदर्शनास आणून दिले होते, परंतु याचा क्रमांक वेगळा होता. आता आयोगाने तेजस्वी यादव यांना पुढील चौकशीसाठी संबंधित मतदारकार्ड सोपविण्यास सांगितले आहे.
तेजस्वी यादव यांचे नाव बिहार इंजिनियरिंग कॉलेजच्या पुस्तकालय भवनातील मतदान केंद्र क्रमांक 124 च्या क्रमसंख्या 416 वर नोंद आहे. तेजस्वी यादव यांचा ईपीआयसी क्रमांक आरएबी0456228 असल्याचे आयोगाने स्वत:च्या पत्रात नमूद केले आहे. तसेच पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या क्रमांकाचे मतदार ओळखपत्र जमा करण्याची सूचना आयोगाने तेजस्वी यादव यांना केली आहे.
तेजस्वी यादव यांच्याकडे दोन वेगवेगळी मतदार ओळखपत्रे असल्याचे उघड झाल्याने आयोगाने त्यांना नोटीस जारी केली आहे. तेजस्वी यादव यांनी ईपीआयसी क्रमांक आरएबी2916120 चा उल्लेख केला होता, परंतु हा अधिकृतपणे जारी करण्यात आलेला नाही. यामुळे तेजस्वी यांनी मतदार ओळखपत्र जमा करावे असे आयोगाने त्यांना सांगितले आहे.
मतदारयादीतून स्वत:चे नाव गायब असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केला होता. या आरोपानंतर आयोगाने केलेल्या तपासणीत तेजस्वी यादव यांचे नाव मतदारयादीत असल्याचे आणि त्यांचा ईपीआयसी क्रमांक आरएबी0456228 असल्याचे समोर आले. निवडणूक आयोगाने तेजस्वी यादव यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागविले आहे. दोन मतदार ओळखपत्रं बाळगल्याप्रकरणी तेजस्वी यांच्यावर आयोगाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.