मुनीरने डोनाल्ड ट्रम्प यांना गंडवलं! तेलाचे साठे पाकिस्तानचे नव्हे, बलुचिस्तानचे; बलोच नेते मीर यार यांचा अमेरिकेच्या करारावर आक्षेप

अमेरिका व पाकिस्तानमध्ये झालेल्या तेल करारावर बलूच नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘तेलाचे साठे पाकिस्तानात नव्हे तर बलुचिस्तानात सापडले आहेत. त्यावर पाकचा कुठलाही अधिकार नाही. पाकचे लष्करप्रमुख आसीम मुनीर याने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या संपूर्ण सरकारला गंडवले आहे, असा दावा बलोच नेते मीर यार यांनी केला आहे.
मीर यार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना एक खुले पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पाकिस्तान व अमेरिकेतील तेल करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘तेलाचे मोठे साठे, नैसर्गिक वायू, तांबे, लिथियम, युरेनियम व इतर खनिजे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात नाहीत, तर बलुचिस्तानात आहेत. बलुचिस्तान हा सार्वभौम देश आहे. आम्ही विकले जाणाऱ्यांपैकी नाही. पाकिस्तानच काय, चीन किंवा इतर कोणत्याही देशाला आमची नैसर्गिक साधन-संपत्ती ओरबाडू देणार नाही, असे मीर यार यांनी ठणकावले.’ ‘पाकिस्तीन सैन्याने ट्रम्प सरकारची दिशाभूल केली आहे. अमेरिकेला भूगोलाबद्दल चुकीची माहिती दिली आहे, असा दावाही त्यांनी पत्रात केला.’
हा जगाच्या सुरक्षेसाठी धोका
'पाकिस्तानचे सैन्य आणि आयएसआय एकल गुप्तचर संघटना दहशतवाद्यांचे आश्रयदाते आहेत? बलुचिस्तानातील तेल आणि खनिज संपत्ती त्यांच्या हाती लागू देणे म्हणजे दहशतवादाला उत्तेजन देण्यासारखे आहे? ती घोडचूक ठरेल? जगाच्या सुरक्षेसाठी ते धोकादायक आहे? पाकिस्तानला यातून पैसा मिळाल्यास जगभरात दहशतवादाचे जाळे पसरवण्यासाठी त्याचा वापर होईल? हा पैसा हिंदुस्थान व इस्रायलच्या विरोधात वापरला जाईल? बलोच जनतेला याचा काडीचा फायदा होणार नाही, असा इशारा मीर मित्र यांनी दिला. '
Comments are closed.