Sayli Agawane : दिव्यांग कथक नृत्यांगना सायली आगवणे

काही दिवसांपूर्वीच अभिनेता आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात एका बास्केटबॉल प्रशिक्षकाची आणि ‘डाउन सिंड्रोम’ ग्रस्त मुलांची कहाणी दाखवण्यात आली आहे. खरं तर, डाउन सिंड्रोम ही एक जन्मजात अनुवांशिक स्थिती असते, ज्यामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास पूर्ण होत नाही किंवा उशिरा होतो. डाऊन सिंड्रोम मुलांचं आयुष्य सोपं नसतं. पण, आज आपण अशा एका डाऊन सिंड्रोम मुलीची कहाणी पाहणार आहोत, जीने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

आपल्या समाजात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी दिशादर्शक म्हणून काम पाहिले आहे. त्यातील एक आहे पूण्यातीलसायली नंदकिशोर आगवणे. अपंगत्वावर मात करून शास्त्रीय नृत्य जागतिक स्तरावर घेऊन जाण्यात सायलीचं मोठं योगदान आहे. डाऊन सिंड्रोमने प्रभावित असलेल्या सायलीने तिच्या अभुतपूर्व कामगिरीने डाऊन सिंड्रोम पीडित मुलांच्या पालकांसमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे.

नारी शक्तीने सन्मानित –

2020 मध्ये दिव्यांग कथ्यक नृत्यांगना सायली नंदकिशोर आगवणेला राष्ट्रपती कामनाथ कोविंद यांच्या हस्ते
राष्ट्रपती भवनात नारी शक्तीने सन्मानित करण्यात आले. अत्यंत विपरीत परिस्थितीत, भारतीय शास्त्रीय नृत्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार, प्रसार करण्याच्या कार्याबद्दल सायलीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

जन्मताच डाऊन सिंड्रोम –

सायली आगवणे जन्मताच डाऊन सिंड्रोम या जेनेटिक आजाराने ग्रस्त आहे. खरं तर, डाऊन सिंड्रोम ही अनुवांशिक स्थिती असते ज्यात मुलाच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये एक अतिरिक्त गुणसूत्र असते. ज्यामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत नाही किंवा उशिरा होतो. मात्र, सायलीच्या तीव्र इच्छाशक्तीपुढे हा आजाराला झुकावं लागलं आहे.

9 वर्षांची असताना केली सुरूवात

सायलीच्या बाबांनी तिच्यातील ही नाचण्याची कला पारखली होती.  सायलीने केवळ 9 वर्षांची असताना कथक शिकायला सुरूवात केली होती. कला शिकत शिकत तिने अनेक व्यासपीठांवर नृत्यकला सादर केली आहे. तिने अनेक टि:व्ही शो केले असून अनेक बक्षींसावर आपलं नाव कोरलं आहे. माझ्यासारखी दिव्यांग मुलगी सुद्धा आयुष्यात यश मिळवू शकते, हे मी सिद्ध केलं आहे, असं सायली अभिमानाने सांगते. सायली दररोज किमान 2 तास तरी नृत्याचा सराव करते. सध्या सायली तिच्यासारख्या स्वप्न पाहणाऱ्या जवळपास 100 दिव्यांग मुलांना नृत्याचे प्रशिक्षण देत आहे. तसेच दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी अनेक शाळेतही जात आहे.

एकदंरच, सायलीचा हा अभुतपूर्व प्रवास पाहता परिस्थिती कशीही असो तीव्र इच्छाशक्ती, उमेद आणि मेहनतीच्या जोरावर मानव काहीही करू शकतो, हे सायलीने सिद्ध केलं आहे.

 

 

हेही पाहा –

Comments are closed.