धनंजय मुंडेंना ‘सातपुडा’ बंगला सुटता सुटेना, काही महिन्यांपासून वेटिंगवर असलेले छगन भुजबळ म्हणा
धानंजय मुंडे वर छगन भुजबाल: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी साडेचार महिन्यांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, अद्याप त्यांनी शासकीय निवासस्थान रिकामे केलेले नाही. 4 मार्च रोजी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, पुढील 15 दिवसांत बंगला रिकामा करणे अपेक्षित होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर संबंधित मंत्रालयाची जबाबदारी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे देण्यात आली, आणि 23 मे रोजी सातपुडा बंगल्याबाबत शासकीय आदेशही जारी करण्यात आला. मात्र, अद्याप सरकारी निवास उपलब्ध न झाल्यामुळे छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. आता यावर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावीत आणि निवासस्थाने कुठे असावीत या संदर्भातली व्यवस्था पाहत असते. त्यांनी मला पंधरा दिवसांनी पत्र दिले की, तुमच्यासाठी अमुक-अमुक निवासस्थान देण्यात आलेले आहे. याचा अर्थ तुम्ही तिथे राहायला जावे. आता राहायला जावं असे म्हटल्यानंतर एखादं घर खाली असेल तरच आपण राहायला जाऊ शकतो. तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय बाहेर काढणार? त्यातही ते आमचे सहकारी आहे. मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा बोललेलो नाही. आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील. ते काय निर्णय घेतील? याची मला काही कल्पना नाही, असे त्यांनी सांगितले.
मी काय तक्रार करणार?
या संदर्भात आपण अजित पवार अथवा इतर कोणत्या नेत्यांशी चर्चा केली आहे का? याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, अजितदादांनी विचारलं पण मी म्हटलं की, घर खाली झालं की जाईन. आमचे ते पक्षातले सहकारी आहेत. मी काय तक्रार करणार? मी फार-फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन की दुसरं एखादं छोटं मोठं घर असेल तर ते द्या. मुख्यमंत्री काय निर्णय घेतील ते पाहू, असे त्यांनी म्हटले. तसेच, मी यावर जास्त चर्चा करणार नाही. सामान शिफ्ट करायचं असेल तर मुदत वाढवून घेतात, नसेल तर दंड, भाडं द्याव लागतं, असेही भुजबळ म्हणाले.
धनंजय मुंडेंना 42 लाखांचा दंड
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याने विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली. परिणामी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या घटनेला साडेचार महिने होऊन देखील धनंजय मुंडे यांनी शासकीय बंगला सोडला नसल्याने त्यांना आता दंड लावण्यात आला आहे. आणि त्याची रक्कम आता तब्बल 42 लाखांपर्यंत पोहचल्याची माहिती समोर येत आहे.
https://www.youtube.com/watch?v=Ky8utb0jrh8
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.