हिंदुस्थानकडून युक्रेन युद्धाला निधी पुरवण्याचे काम, ट्रम्प सरकारची टीका

हिंदुस्थानकडून युक्रेन युद्धाला निधी पुरवण्याचे काम सुरू आहे अशी टीका ट्रम्प सरकारने केली आहे. तसेच ही बाब अतिशय आश्चर्यजनक असल्याचे म्हटले आहे.
इंडिया टुडेने दिलेले वृत्तानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक वरिष्ठ सल्लागार स्टीफन मिलर यांनी हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल टीका केली आहे. त्यांनी हिंदुस्थानवर अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धाला निधी पुरवल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प प्रशासन रशियाकडून अजूनही तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही टीका करण्यात आली आहे.
स्टीफन मिलर, हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रभावशाली सल्लागारांपैकी एक आहेत, यांनी सांगितले की ट्रम्प यांना स्पष्टपणे असे वाटते की हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी. ट्रम्प यांनी अत्यंत स्पष्टपणे म्हटले आहे की हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी करत युद्धाला निधी पुरवणे हे स्वीकारार्ह नाही असेही मिलर म्हणाले.
मिलर यांनी हिंदुस्थान आणि चीन या दोघांचाही रशियन तेल खरेदीत सारखाच वाटा असल्याचे सांगितले आणि यावर आश्चर्य व्यक्त केले. लोकांना हे ऐकून धक्का बसेल की हिंदुस्थान रशियन तेल खरेदीत चीनच्या बरोबरीने आहे. हे खूप आश्चर्यकारक आहे असेही मिलर म्हणाले. असे असले तरी ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध ‘उत्कृष्ट’ आहेत अशी पुस्तीही त्यानी जोडली.
Comments are closed.