विरोधकांकडून आरोपांची राळ, वाल्मिक कराडचा मुलगा संतापला, म्हणाला,

महादेव मुंडे प्रकरणात सुशील कराड: परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात (Mahadev Munde Case) वाल्मिक कराड (Walmik Karad) हा मुख्य सुत्रधार असल्याचा खळबळजनक आरोप बाळा बांगर (Bala Bangar) यांनी केला होता. तर वाल्मिक कराडची दोन्ही मुलं देखील या हत्येत सहभागी असल्याचा दावा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंडेंच्या हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना केली आहे. यानंतर अवघ्या काही तासांतच परळीतून पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती. ज्या पाच जणांना ताब्यात घेत चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये वाल्मिक कराडची दोन्ही मुलं श्रीगणेश आणि सुशील या दोघांचा समावेश होता. पोलिसांनी या दोघांची तब्बल 17 तास कसून चौकशी केल्याची माहिती देखील समोर आली होती. आता या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड (Sushil Karad) याने एबीपी माझाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सुशील कराड म्हणाला की, महादेव मुंडे यांना माझे वडील मी आणि माझा भाऊ ओळखत देखील नव्हतो. आमची हात जोडून विनंती आहे की, तुम्ही एसआयटी, सीआयडीची मागणी करतात. मात्र, मी सीबीआय चौकशीची मागणी करत आहे.  एकदा होऊनच जाऊ द्या, त्यांना काय सिद्ध करायचं आहे.  त्यांच्याकडे देखील काही पुरावे असतील तर आमच्याकडे देखील पुरावे आहेत.  आमचे सर्व कुटुंब पत्रकार परिषद घेणार आहोत. त्यात आमची भूमिका मांडणार आहोत. यात सीबीआय चौकशीची मागणी आम्ही करत आहोत.  यातून जे सत्य आहे ते पुढे येईल, असे त्याने म्हटले.

आमची 17 तास चौकशी झालेली नाही

सुशील कराड पुढे म्हणाला की, 20 महिन्यानंतर कुणाचं तरी नाव घ्यायचं, यात किती सत्यता आहे? या प्रकरणाचा तपास कुमावत साहेब करत आहेत. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. माझ्या भावाची आणि माझी कोणतीही 17 तास चौकशी झालेली नाही. माझा भाऊ डिस्चार्ज एप्लीकेशनबाबत पिटीशन दाखल करण्यासाठी गेला आहे. माझा भाऊ बाहेर देशात पळून जायचा प्रयत्न करत असेल तर त्याचे पुरावे द्यावे. माझा आणि माझ्या वडिलांचा पासपोर्ट नाही आणि त्याला जर पळून जायचं असेल तर तो कधीच पळून गेला असता. यात आमचा कोणताही संबंध नाही. जे असेल त्याला आम्ही सामोरे जाऊ, असेदेखील त्याने म्हटले.

ज्ञानेश्वरी मुंडेंकडे कोण ऑफर घेऊन गेलं?

धनंजय मुंडे यांना का टार्गेट केले जात हे सर्वांना माहित आहे. महादेव मुंडे यांना माझे वडील मी आणि माझा भाऊ ओळखत नव्हतो. ज्यावेळी व्यक्तीला ओळखत नाही त्या व्यक्तीला मारायचा संबंध काय? ज्ञानेश्वरी ताई तुमच्याकडे कोण ऑफर घेऊन आलं त्याचं नाव पुढे करा, असे देखील सुशील कराड याने एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

महादेव मुंडे यांच्या पत्नी काल मुख्यमंत्र्याना भेटल्या आणि लगेच आरोपींची धरपकड, याचाच अर्थ राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पोलिसांवर दबाव: जितेंद्र आव्हाड

आणखी वाचा

Comments are closed.