पुण्यात तरुणींचा छळ, माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्याचा फोन? रोहित पवारांचं सूच

Pune Kothrud Dalit girls torture: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित तरुणींचा छळ करण्याचा आल्याचा गंभीर आरोप नुकताच करण्यात आला होता. पोलिसांनी हे सर्व दावे फेटाळले असले तरी पीडित तरुणी संबंधित पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या. पुण्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते या तरुणींच्या मदतीला धावून आले होते. रविवारी रात्री तीन वाजेपर्यंत रोहित पवार (Rohit Pawar), सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, प्रशांत जगताप आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून होते. मात्र, त्यानंतरही पोलिसांनी या तरुणींची तक्रार दाखल करुन घेतली नाही. या पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पोलिसांच्या भूमिकेवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोथरूड पोलिसांनी (Kothrud Police) तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ केली, यासंदर्भात प्रचंड रोष असताना पोलिसांनी FIR नोंदवला नाही, त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत,असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Rohit Pawar: रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

1. एवढा प्रचंड रोष असतानाही पोलिसांनी FIR का नोंदवला नाही? पोलिसांवर कुणाचा दबाव होता?
2. छत्रपती संभाजीनगर येथील ओबीसी समाजातील ती पिडीत युवती कोण?
3. या प्रकरणाशी संबंधित माजी पोलीस अधिकारी कोण? त्यांचा पोलिसांवर दबाव होता का? या माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याने पोलिसांना फोन केले?
4. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोथरूड पोलिसांकडे कायदेशीर पत्रव्यवहार किंवा परवानगी घेतली होती का?
5. कोथरूडला तीन युवतींची चौकशी करण्यात आली, एकीला कामाच्या ठिकाणावरून पोलिसांनी नेले, यासाठी पोलिसांकडे तसा सर्च वारंट होता का?
6. चौकशी दरम्यान महिला पोलिसांसोबतच संबंधित माजी पोलीस अधिकारी आणि पोलिस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्ती युवतींच्या कोथरूड येथील घरी चौकशीसाठी का गेल्या होत्या? पोलीस नसलेल्या या व्यक्ती कोण आहेत? या व्यक्ती पोलीस दलातील कुणाशी संबंधित आहेत? कुणाशी त्यांची मैत्री आहे? त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
7. या तीन युवतींना जीवे मारण्याची धमकी कुणी आणि का दिली?

एकूणच या प्रकरणात पोलीस प्रशासनाने हे प्रकरण ज्याप्रकारे हाताळले त्यावरून पोलिसांवर असलेला राजकीय दबाव स्पष्ट दिसत असून पोलीस यंत्रणा केवळ राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत, असा समज पसरत आहे. परिणामी पोलीस यंत्रणेविषयीच जनतेत अविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांना या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=6pnr4blhuyq

आणखी वाचा

पुण्यात दलित मुलींच्या छळाची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ, प्रकाश आंबेडकरांनी एक फोन फिरवला अन् निर्वाणीचा इशारा दिला

सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी अ‍ॅट्रोसिटीची तक्रार घेतली नाही, कोथरुडमध्ये दलित मुलींचा छळ, सुजात आंबेडकर संतापले

कोथरुड पोलिसांकडून मुलींच्या छळाचा आरोप, पहाटे साडेतीन वाजेपर्यंत रोहित पवार, सुजात आंबेडकर ठाण मांडून बसले, पुण्यात नेमकं काय घडलं?

कोथरुड पोलिसांकडून छळ, रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस आयुक्तालयात ठिय्या, पण पुणे पोलीस मुलींना म्हणाले….

तुमची जातच तशी, किती जणांसोबत झोपलात, रां# आहात की लेस्बियन आहात? कोथरुड पोलीस ठाण्यात मुलींच्या छळाचा आरोप

आणखी वाचा

Comments are closed.