पोलिसाने डोळ्यांनी माझं शरीर स्कॅन केलं, मग अंगावर आले अन् हाताने…; पुण्यातील तरुणीच्या तक्रा
गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा (Pune Crime News) आरोप केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या तपासासाठी या मुलींना कोथरुड पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. तेथील रिमांड रुममध्ये या मुलींचा पाच तास छळ करण्यात आला. यावेळी पोलिसांकडून जातीवाचक शेरेबाजी आणि मुलींचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप सदर मुलींकडून करण्यात आला आहे. दरम्यान, सदर मुलीने पोलिसांना तक्रारीचं दिलेल्या पत्रात नेमकं काय काय म्हटलंय, याबाबत एबीपी माझाच्या हाती माहिती लागली आहे.
पुण्यातील तरुणीच्या तक्रारीत काय?
पोलिसांनी आम्हा तिघींना कोथरुड पोलीस स्टेशनच्या वरच्या मजल्यावरील रुममध्ये ठेवलं. यावेळी माझं आडनाव विचारण्यात आले. तुझं आडनाव काय?, मग तु अशीच वागणार, असं पोलीस म्हणाले. यादरम्यान एक पोलीस अधिकारी म्हमाली, की तुझा स्वभाव असाच राहिला तर तुला कुणीतरी असंच मारुन टाकेल. तुझा खून होईल. तु अशी जिवंत राहूच शकत नाही. त्यामुळे मी घरातल्यांपासून लांब इथे (पुण्यात) एकटी राहते. त्यामुळे या धमकीमुळे मला सतत भिती वाटतेय, असं तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीच्या पत्रात म्हटलं आहे.
किती पोरांसोबत झोपते?-
एकट्या राहत असंच मोकाट सुटल्याय, किती पोरांसोबत झोपते?, तुझ्या रुमवर पोरं झोपायला येतात का?, तुझी आणि तुझ्या मैत्रिणीची ओढणी एकाच रंगाची आहे. तुम्ही लेसबियन दिसताय. तुम्हाला पाहूनच वाटतंय की तुम्ही LGBTQ Community च्या आहात, अशी वाक्य बोलून आळीपाळीने मला Verbally Sexually Abuse केलं. तुला बाप नाही, फक्त माय आहे. तु घरी पगारातले पैसे देतेस का?, त्यांनीपण तुला वाऱ्यावर सोडून दिलंय. चौकशीशी काहीच संबंध नसलेली ही वाक्य बोलून मला टॉर्चर केलं गेलं, असं तरुणीने तक्रारीत म्हटलंय.
पोलिसांनी डोळ्यांनी माझं शरीर स्कॅन केलं, मग…-
पोलीस स्थानकामधील पुरुष पोलीस सतत माझं शरीर न्याहाळत होते. जणू काही डोळ्यांनी माझं शरीर स्कॅन करत होते. महिला पोलिसही सतत निरीक्षण करत होत्या. काहीतरी प्रश्न विचारत असताना एक पोलीस अधिकारी अंगावर आले. त्यांचा हाताचा, खांद्याचा, हनूवटीचा घाणेरडा विकृत असहज स्पर्श मला झाला. एका प्रकरणात साधारण चौकशीसाठी आणलं असताना एक पोलीस अधिकाऱ्याने मला गालांवर, पाठीवर गुद्दे-चापटा मारल्या. कमरेवर, पायांवर लाथा मारल्या असा आरोपही तरुणीने तक्रारीत केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. त्या मुलीला मदत केलेल्या तीन मुलींना स्थानिक पोलिसांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता ताब्यात घेतलं गेलं. तसेच त्या महिलांवर पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक अपमान केल्याचा आरोप मुलींनी केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनचे अमोल कामटे आणि छत्रपती संभाजीनगर येथील महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांच्यावर थेट मारहाणीचे आरोप करण्यात आले आहेत.
https://www.youtube.com/watch?v=rxlzid9kek
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.