नागपूरमध्ये मद्यधुंद सैन्य अधिकाऱ्याच्या गाडीने 30 लोकांना चिरडले, जमावाने दिला चोप

नागपूरमध्ये दारूच्या नशेत गाडी चालवून एका 30 लोकांना चिरडलं आहे. या अपघातात 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर उपस्थित जमावाने चालकाला ताब्यात घेऊन त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाले केले.
आरोपी अधिकारी हरषपाल महादेव वाघमारे (40) हे भारतीय लष्करात कार्यरत असून सध्या आसाममध्ये तैनात आहेत. ते चार दिवसांच्या रजेवर होते आणि महाराष्ट्रात भेटीदरम्यान ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघमारे हमलपूरीच्या दिशेने जात होते. तेव्हा त्यांच्या गाडीवरून ताबा सुटला. उपस्थितांनी सांगितले की, वाघमारे यांनी रस्त्यावर चालणाऱ्यांना बेदरकारपणे उडवले आणि नाल्यात त्याची गाडी कोसळली. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी वाघमारे यांना गाडीतून बाहेर काढले आणि चोप दिला. या मारहाणीत वाघमारे जखमी झाले. पोलिसांनी वाघमारेंना रुग्णलयात दाखल केले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.