IND vs ENG: मोहम्मद सिराजने इंग्लंडमध्ये केली मोठी कामगिरी! ऐतिहासिक विक्रम नावावर करत रचला इतिहास
मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) इंग्लंडच्या भूमीवर इतिहास रचला आहे. तो इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. 2025 मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत त्याने एकूण 23 विकेट्स घेतल्या. फक्त ओव्हल टेस्टमध्येच त्याने तब्बल 9 विकेट्स घेतल्या.
एका मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत सिराज (Mohmmed Siraj) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे दोघंही आता संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहेत. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत बुमराहने 2021-2022 च्या दौऱ्यात एकूण 23 विकेट्स घेतल्या होत्या आणि आता सिराजनेही तेवढ्याच विकेट्स घेत इंग्लंडच्या दौऱ्यात स्वतःचं नाव त्या यादीत कोरलं आहे.
इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार आहे, ज्याने 2014 मध्ये झालेल्या मालिकेत 19 विकेट्स घेतल्या होत्या.
इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज:
जसप्रीत बुमराह – 23 विकेट्स
मोहम्मद सिराज – 23 विकेट्स
भुवनेश्वर कुमार – 19 विकेट्स
2025 मध्ये झालेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत मोहम्मद सिराज सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने एकूण 23 फलंदाजांना माघारी धाडलं.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जोश टंग आहे, ज्याने 19 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने 17 विकेट्स, तर जसप्रीत बुमराहने फक्त 3 सामन्यांमध्येच 14 विकेट्स घेतल्या. तसंच ओव्हल कसोटी सामन्यात 8 विकेट घेणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने (Prasiddh Krishna) देखील या मालिकेत एकूण 14 विकेट्स घेतल्या.
2025 कसोटी मालिका टॉप विकेट घेणारे गोलंदाज
मोहम्मद सिराज – 23 विकेट्स
जोश तुंग – 19 विकेट्स
बेन स्टोक्स – 17 विकेट्स
जसप्रीत बुमराह – 14 विकेट्स
प्रसिद्ध कृष्णा – 14 विकेट्स
Comments are closed.