Pune News ड्रेनेज लाईनच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला, तीन कामगार अडकले

पुण्यातील नांदेड सिटीत ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना खणलेल्या मोठ्या खड्ड्यात काम करणाऱ्या कामगारांवर मातीचा मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत तीन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. यातील एकाला अग्निशमन दल व बचाव पथकाने बाहेर काढले आहे. तर इतर दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दल तसेच पीडीआरएफ संयुक्तरित्या बचावकार्य करत आहेत.
नांदेड सिटी कंपाऊंड वॉलच्या बाहेरील बाजूस ही घटना घडली असून याठिकाणी महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरू होते.
Comments are closed.