जो रूटने केला वर्ल्ड रेकाॅर्ड! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटर

जो रूट वर्ल्ड रेकॉर्डः भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीत संपली आहे. या मालिकेत अनेक रेकाॅर्ड झाले, परंतु इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने असा एक रेकाॅर्ड केला, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. (Joe Root Record)

जो रूटसाठी भारत विरुद्ध इंग्लंड मालिका खूप चांगली ठरली. त्याने उत्कृष्ट फलंदाजी करत आपल्या संघाला विजयासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. जो रूटने या मालिकेत एकूण 5 सामने खेळून 537 धावा केल्या. यात 3 शतके आणि 1 अर्धशतकाचा समावेश आहे. या मालिकेत जो रूटची सरासरी 67.12 होती. त्याने 150 धावांची एक मोठी खेळीही केली. शुबमन गिलनंतर तो या मालिकेत दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, पण इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा जो रूटनेच केल्या.

रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये एकाच गोलंदाजाविरुद्ध 600 पेक्षा जास्त धावा करणारा जगातील पहिला फलंदाज (First Batsman to Score 600+ Runs vs One Bowler) बनला आहे. जो रूटने आतापर्यंत रवींद्र जडेजाविरुद्ध 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (Joe Root vs Ravindra Jadeja) यापूर्वी, एकाच गोलंदाजाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा रेकाॅर्ड स्टीव्ह स्मिथच्या नावावर होता, ज्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडविरुद्ध 577 धावा केल्या होत्या. (Steve Smith vs Stuart Broad)

भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, विराट कोहली या बाबतीत पहिल्या क्रमांकावर येतो. विराट कोहलीने नाथन लायनविरुद्ध 573 धावा केल्या आहेत. (Virat Kohli vs Nathan Lyon) नाथन लायनविरुद्धच भारताच्या चेतेश्वर पुजारानेही कोहलीपेक्षा किंचित कमी 571 धावा केल्या आहेत.

यापैकी कोणत्याही फलंदाजाने एका गोलंदाजाविरुद्ध 600 धावांचा टप्पा गाठला नाही. तसेच, यानंतरचे फलंदाज लवकरच 600 चा आकडा पार करतील याची शक्यताही खूप कमी आहे. स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्ती घेतली आहे, विराट कोहलीनेही आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पुजाराने अद्याप निवृत्ती घेतली नसली तरी, तो भारतीय संघातून दूर आहे आणि त्याची आता पुन्हा संघात परतण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे जो रूटने केलेला हा पराक्रम कोणाच्याही विचारात नव्हता, हे निश्चित. (Joe Root Record)

Comments are closed.