कसोटी प्रशिक्षणामध्ये किती पास- नापास? कोच गौतम गंभीर यांच्या कामगिरीचे असे आहेत आकडे!
भारतीय आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही देशांमध्ये झालेली 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीत संपली. भारताने शेवटच्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन करत 6 धावांनी विजय मिळवला. सलग दोन कसोटी मालिका गमावल्यावर अखेर भारताला ही मालिका ड्रॉ यश मिळालं. गंभीरच्या कार्यकाळात भारतीय संघाने कसोटी मालिकांमध्ये कशी कामगिरी केली आहे?
गौतम गंभीर (Gautam Gambhir) जेव्हा पासून हेड कोच झाले, तेव्हापासून भारताने बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर 2 टेस्ट सामन्यांची मालिका खेळली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने ही मालिका 2-0 अशी जिंकली. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध देखील भारताने 3 कसोटी सामन्यांची मालिका घरच्या मैदानावर खेळली, पण या मालिकेत भारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. टीम इंडियाला ही मालिका 0-3 ने गमवावी लागली.
यानंतर भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला. तिथे 5 सामन्यांची टेस्ट मालिका झाली. पण या मालिकेतही भारताचं प्रदर्शन फारसं समाधानकारक नव्हतं. मात्र इंग्लंड दौऱ्यावर भारताच्या युवा खेळाडूंनी जोरदार कामगिरी केली. एक वेळ अशी होती की भारत 1-2 अशा स्थितीत पिछाडीवर होता, पण शेवटच्या दोन सामन्यांत जबरदस्त लढत देत भारताने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली.
गौतम गंभीर यांच्या कोचिंगमध्ये भारताने आतापर्यंत 15 टेस्ट सामने खेळले आहेत. त्यात भारताने 5 सामने जिंकले, 8 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आणि 2 सामने बरोबरीत राहिले. हे आकडे पाहता गंभीर कितपत यशस्वी ठरले, याचा अंदाज येतो.
जरी टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांची आकडेवारी काहीशी निराशाजनक वाटत असली, तरी वनडे आणि टी-20 मध्ये गंभीरने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकली, आणि विशेष म्हणजे या स्पर्धेत भारत एकही सामना हरला नव्हता.
Comments are closed.