‘क्रिकेट कुणासाठीच थांबत नाही…’ इंग्लंड मालिकेनंतर पठानचं खोचक ट्विट; विराटला केलं टार्गेट?
इरफान पठाण कदाचित रोहित शर्मा आणि विराट कोहली येथे खोद घेते : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या युवा भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मालिकेच्या सुरुवातीस अनेक जणांचं मत होतं की, नवीन कसोटी कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील हा अनुभवहीन संघ इंग्लंडमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जाईल. पण असं काहीच घडलं नाही. या ‘यंग ब्रिगेड’ने पाच कसोटी सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली. ओव्हलवर झालेल्या निर्णायक पाचव्या कसोटीत भारताने 6 धावांनी थरारक विजय मिळवत मालिका वाचवली.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने दाखवलेली लढवय्यी कामगिरी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे. या दरम्यान, मालिका संपल्यानंतर माजी क्रिकेटपटू इरफान पठान याचं एक ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. अनेकांनी या ट्विटचा संदर्भ रोहित-विराटवर अप्रत्यक्ष टोला म्हणून घेतला आहे.
खरं तर, इंग्लंड दौऱ्याच्या आधी म्हणजेच मे महिन्यात, आयपीएल 2025 दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर चर्चा सुरू झाली की, टीम इंडियाच्या कसोटी सामन्यांवरील लोकप्रियता आता कमी होईल आणि इंग्लंडमधील कामगिरीही फिकी ठरेल. मात्र शुभमन गिलच्या नेतृत्वात या तरुण खेळाडूंनी आपल्या जिद्दीने सर्व समीकरणं उलथून टाकली. त्याचाच प्रभाव इरफान पठान यांच्यावरही झाला.
आपल्या अधिकृत X (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवरून इरफान पठान याने लिहिलं की, “ही मालिका पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून देते, की क्रिकेट कोणासाठी थांबत नाही.”
ही मालिका पुन्हा एकदा प्रत्येकाला आठवण करून देते
क्रिकेट कोणालाही थांबत नाही!
– इरफान पठाण (@इरफानपॅथन) 4 ऑगस्ट, 2025
या मालिकेत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली होती. लीड्समध्ये इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली. त्यानंतर एजबॅस्टनमध्ये भारताने जोरदार प्रत्युत्तर देत इंग्लंडला 336 धावांनी पराभूत केलं. लॉर्ड्सवर मात्र इंग्लंडने पुन्हा पुनरागमन करत 22 धावांनी विजय मिळवला. मँचेस्टरची कसोटी बरोबरीत सुटली आणि अखेरच्या ओव्हल कसोटीत भारताने 6 धावांनी विजय मिळवत मालिकेचा समतोल साधला. या सर्व सामन्यांचे निकाल पाचव्या दिवशी लागले, यावरून दोन्ही संघांमध्ये किती जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला हे स्पष्ट होते.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.