हिंदुस्थान रशियाला पैसा पुरवतोय, ट्रम्प यांच्या शिलेदाराचा आरोप

रशियाकडून मोठय़ा प्रमाणावर तेल आयात करणाऱया हिंदुस्थानवर अमेरिकेने पुन्हा एकदा हल्ला केला आहे. रशियाचे तेल घेऊन हिंदुस्थान रशियाला युव्रेनविरुद्धच्या युद्धासाठी पैसा पुरवतोय, असा थेट आरोप डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू शिलेदार स्टीफन मिलर यांनी केला आहे. मिलर हे व्हाईट हाऊसमध्ये डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ आहेत. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हिंदुस्थानवर आरोप केला. ‘‘चीनच्या हातात हात घालून हिंदुस्थान रशियाचे तेल खरेदी करतोय हे आश्चर्यकारक आहे,’’ असे मिलर म्हणाले.
Comments are closed.