‘एआय’मुळे 80 टक्के नोकऱ्या धोक्यात, उद्योगपती विनोद खोसला यांनी व्यक्त केली भीती

जगभरातील टेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. आगामी पाच वर्षांत एआयमुळे 80 टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जातील. कारण पुढचे युग हे एआय युग आहे, असा इशारा प्रसिद्ध उद्योगपती विनोद खोसला यांनी दिला आहे. झीरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये बोलताना खोसला यांनी हा अलर्ट दिला आहे. एआयमुळे 80 टक्के नोकऱया पूर्णपणे बदलतील. 2040 पर्यंत कर्मचाऱयांचे काम करण्याचे दिवस संपतील. आज एआयमुळे अनेक कंपन्या हजारो कर्मचारी कपात करत आहेत. विद्यार्थ्यांना सल्ला देताना खोसला म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पेशलाइजेशन बनण्याऐवजी सर्व ज्ञान ठेवणे गरजेचे आहे. जर विद्यार्थ्यांकडे संकुचित ज्ञान असेल, तर ते त्यांच्यासाठी डोईजड होईल. पुढील 25 वर्षांत एआय शिक्षण, आरोग्य स्वस्त होईल. एआय आधारित डॉक्टर आणि शिक्षक प्रत्येक व्यक्तीला सल्ला देतील. ज्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन आहे, त्यांना स्टॅनपर्ह्डसारखे शिक्षण फ्रीमध्ये मिळेल.

Comments are closed.