IND VS ENG ओव्हलवर लेव्हल, साहेबाला धुतले! टीम इंडियाच्या पोरांनी कमाल केली, मालिका बरोबरीत

पोरांनी कमाल केली. नव्या दमाच्या संघाने गोऱ्या साहेबाला धु-धु धुतले. आता जिंकायचंच हाय… या ध्येयाने मैदानात उतरलेल्या शुभमन गिलच्या संघाने मैदान मारलं. मँचेस्टर कसोटीचा शेवट आणि काल हॅरी ब्रूकचा झेल टिपताना केलेल्या घोडचुकीनंतर टीकेचे बाण सोडणाऱया टीकाकारांना सिराजने कसोटी इतिहासातील सर्वोत्तम विजयाची भेट दिली. मालिका आणि कसोटी विजयासाठी अवघ्या 35 धावांचा पाठलाग करणाऱया यजमानांचा विजयापासून सहा धावा दूर असतानाच गेम ओव्हर कsला आणि ओव्हलवर खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीत हिंदुस्थानला 2-2 अशी लेव्हल करून दिली.

आता जिंकायचंच हाय… या ध्येयाने मैदानात उतरलेल्या शुभमन गिलच्या संघाने मैदान मारलं. मँचेस्टर कसोटीचा शेवट आणि कालहॅरी ब्रूकचा झेल टिपताना केलेल्या घोडचुकीनंतर टीकेचे बाण सोडणाऱया टीकाकारांना मोहम्मद सिराजने श्वास रोखणाऱया कसोटीत इतिहासातील सर्वोत्तम विजयाची भेट दिली. मालिका आणि कसोटी विजयासाठी अवघ्या 35 धावांचा पाठलाग करणाऱया यजमानांचा विजयापासून सहा धावा दूर असतानाच सिराज आणि प्रसिधने गेम ओव्हर केला आणि ओव्हलवर खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीत हिंदुस्थानला 2-2 अशी लेव्हल करून दिली. आधी लीड्स, मग लॉर्ड्स कसोटीत हिंदुस्थानची विजयासाठीची झुंज अपेशी ठरली होती; मात्र आज हिंदुस्थानच्या सिराज-प्रसिधने त्या झुंजीला विजयाचा टिळा लावला आणि मालिकेत बरोबरी साधण्याचे शौर्य दाखवले.

काल पावसाच्या सावटामुळे झालेल्या अंधाराने हिंदुस्थानी संघाच्या ध्येयासमोरही अंधारी आणली होती. आज सकाळी सूर्य डोकावला असला तरी हिंदुस्थानी संघाच्या मनात ढग भरून आले होते. मालिका बरोबरीत सोडवणार की मालिका गमावणार, हाच प्रश्न सर्वांच्या मनी होता; पण जॅमी स्मिथची विकेट घेत सिराजने संघात जोश आणला आणि तो जोश पुढे कायम ठेवत आपण जिंकणारच ही भावनाही निर्माण केली. जॅमी ओव्हरटन सिराजच्या गोलंदाजीवर पायचीत झाला तेव्हा अवघ्या ओव्हलवर ‘भारतमाता की जय’चा जल्लोष होऊ लागला होता. ‘आता थांबायचं नाय, आता जिंकायचंच हाय’ या ध्येयाने पूर्ण संघ पेटून उठला. सिराजने दोन जॅमींना बाद करून विजयाचे ढोल बडवायला सुरुवात केलीच होती. पुढे प्रसिधने जॉश टंगच्या यष्टय़ा वाकवून त्याचा आवाज वाढवला.

9 बाद 357 या धावसंख्येवर असलेला इंग्लंड विजयापासून 17 धावा दूर होता. तेव्हा खांदा निखळलेला ख्रिस व्होक्स संघाच्या विजयासाठी एका हाताने फलंदाजी करायला मैदानात उतरला. तो एका हाताने कशी फलंदाजी करणार, हा साऱयंना प्रश्न पडला होता. पण गस अॅटकिन्सनने त्याला फलंदाजी येऊ नये याची पुरेपूर काळजी घेत संघाच्या धावसंख्येत 10 धावांची भर घातली. मात्र विजयापासून 7 धावा दूर असताना सिराजने अॅटकिन्सनचा हा संघर्ष त्रिफळाचीत करत हिंदुस्थानच्या ऐतिहासिक विजयावर, मालिका बरोबरीवर आणि मालिकेच्या समाधानकारक शेवटावर शिक्कामोर्तब केलं. 374 धावांचा बॅझबॉल पाठलाग करणाऱया इंग्लंडला 367 धावांवर रोखत हिंदुस्थानने कसोटी इतिहासातील आपल्या सर्वात थरारक अशा 6 धावांच्या विजयाची नोंद केली. पहिल्या डावात 4 विकेट टिपणाऱया सिराजने दुसऱया डावात 104 धावांत 5 विकेट टिपण्याचा पराक्रम केला. प्रसिधनेही दोन्ही डावांत प्रत्येकी चार विकेट टिपत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

हिंदुस्थानने या कसोटीच्या पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या, तर इंग्लंडने पहिल्या डावात 247 धावा करत 23 धावांची आघाडी मिळवली होती. मात्र दुसऱया डावात हिंदुस्थानी फलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन करत 396 धावा फटकावत इंग्लंडपुढे 374 धावांचे जबरदस्त आव्हान ठेवले होते, ज्याचा इंग्लंडने आपल्या बॅझबॉल शैलीत पाठलाग करीत कसोटी क्रिकेटला तोड नसल्याचे दाखवून दिले.

विक्रमी कसोटी

ओव्हलवरील पाचव्या कसोटीत हिंदुस्थानने इंग्लंडवर फक्त 6 धावांनी विजय मिळवला आणि कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावांच्या विजयाची नोंद केली. याआधी 2004 मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय मिळवला होता.

बुमरा नसतानाच जिंकलो

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बुमरा फक्त तीन कसोटीच खेळणार याचा इतका बाऊ करण्यात आला होता की, बुमरा म्हणजेच सर्वकाही. पण प्रत्यक्षात तो ज्या बार्ंमगहम आणि ओव्हल कसोटीत खेळला नाही त्याच दोन्ही कसोटी हिंदुस्थानी संघाने जिंकल्या. विशेष म्हणजे, बुमराच्या अनुपस्थितीत सिराज, आकाश दीप आणि प्रसिधने भन्नाट गोलंदाजी केली हे विशेष!

जिद्दीचं आणि एकतेचं प्रतीक – शुभमन गिल

हा विजय केवळ धावांचा फरक नाही, तर आमच्या मनगटातील ताकदीचं उत्तर आहे. ज्या प्रकारे हा सामना शेवटच्या सत्रात पोहोचला होता, तिथून जिंकून दाखवणं हे आमच्या संघाच्या जिद्दीचं आणि एकतेचं प्रतीक आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आशा सोडली नाही. सिराज आणि प्रसिधने दबावाखाली ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, ती खरंच अफाट होती. त्यांनी सामना परत आमच्या बाजूला खेचून आणला. हा विजय माझ्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण राहील, अशी भावना गिलने बोलून दाखवली. तसेच गौतम गंभीर यांनी, आम्ही काही सामने जिंकू, काही सामन्यात हरू; पण आम्ही कधीही शरणागती पत्करणार नाही. शाब्बास मुलांनो, अशा शब्दांत टीकाकारांची तोंडे बंद करण्यासाठी ट्विट केले आहे.

Comments are closed.