भूपेश बागेलला एक धक्का बसला

सर्वोच्च न्यायालयाचा सुनावणीस नकार : ईडी-सीबीआय प्रकरणी याचिका घेतली मागे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि त्यांच्या पुत्राला ईडी आणि सीबीआय प्रकरणी मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बघेल यांच्याकडून दाखल याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. भूपेश बघेल आणि त्यांच्या पुत्राने सीबीआय आणि ईडीकडून करण्यात येणाऱ्या चौकशीच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने बघेल यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे.

छत्तीसगड सरकारने या यंत्रणांना चौकशीसाठी दिलेला अनुमती मागे घेतली आहे. अशास्थिती राज्यात चौकशी करण्याचा अधिकार कुठल्या आधारावर मिळाला असा प्रश्न याचिकेद्वारे विचारण्यात आला. बघेल यांनी दोन्ही यंत्रणांचा चौकशी अधिकार आणि अधिकारक्षेत्रावर गंभीर आक्षेप नोंदविला आहे. तसेच बघेल यांनी अटकेपासून संरक्षणाची मागणी देखील केली होती. चैतन्य बघेल यांना याप्रकरणी अटक झाली असून मद्यघोटाळ्याच्या चौकशीप्रकरणी राजकीय कट रचला जात असल्याचा आरोप बघेल यांनी केला आहे.

 

Comments are closed.