त्या तरूणीने आपला चेहरा वापरण्याचा अधिकार गमावला.
2 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेमुळे झाले नुकसान
मॉडेलिंगचे जग नेहमी सोपे नसते. येथे योग्य लोकांशी योग्यवेळी संपर्क अत्यंत आवश्यक असतो. एका 23 वर्षीय युवतीसोबत अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. तिला एआय मॉडेल करण्याचा प्रस्ताव मिळाला, तो तिने उत्साहात स्वीकारला, परंतु तिने स्वत:च्या चेहऱ्याच्या वापराचा अधिकार कायमस्वरुपी गमाविला हे तिच्या ध्यानातच आले नाही. तिचा चेहरा तिच्या अनुमतीशिवाय कधीही वापरला जाऊ शकतो. यामुळे तिची चिंता वाढली आहे, आता ती याच्याविरोधात जागरुकता वाढविण्याचे काम करत आहे. या युवतीची कहाणी एआयच्या धोक्याकडे इशारा करते. या युवतीने केंडल जेनरच्या एआय अवतार सीरिजच्या चित्रपटांची जादू पाहिली होती. प्रस्ताव देणाऱ्या कंपनीने तिला 1 लाख 73 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. युवतीला हा प्रस्ताव अन् प्रकल्प अत्यंत आकर्षक वाटला. हे अत्यंत अनोखे काम होते, जे ही युवती करणार होती. तिला मॉडेलप्रमाणे प्रेफेशनल शैलीत अप्रोच करण्यात आला, अशाप्रकारचे काम सेलिब्रिटींनी यापूर्वीही केले आहे. याचमुळे युवतीने देखील यात स्वारस्य दाखविले होते.
केली मोठी चूक
युवतीने उत्साहात करार न वाचता स्वाक्षरी केली होती. आपण मोठी चूक केली याची जाणीवच तिला नव्हती. तिने स्वत:च्या चेहऱ्याच्या वापराचे अधिकार कायमस्वरुपी गमाविले आहेत. ती आता एका अशा कराराला बांधील आहे, ज्यात तिचे छायाचित्र कुठल्याही ‘सशुल्क जाहिराती’त तिच्या अनुमतीशिवाय वापरले जाऊ शकते.
उशिरा आली जाग
युवतीला जटिल करार देण्यात आला होता. तिने तो पूर्ण वाचला नव्हता. करारानुसार तिला एआय मॉडेलच्या ट्रेनिंगसाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यावे लागले. करारानुसार ती आता कुठल्याही प्रकारचे ब्रँड एंडोर्स्मेंट करू शकत नव्हती. स्वत:चा कधीच कंटेंट तयार करू शकत नसल्याचे तिला नंतर ध्यानात आले.
Comments are closed.