भाजप प्रवक्ते पदावर राहिलेली व्यक्ती न्यायाधीश होणार असतील तर जनतेला न्याय मिळेल का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
भाजप प्रवक्ते पदावर राहिलेली व्यक्ती न्यायाधीश होणार असतील तर जनतेला न्याय मिळेल का? संविधानाचे रक्षण होईल का? असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी X वर एक पोस्ट करत उपस्थित केला आहे. भाजपच्या (BJP) प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नेमणूक करण्यात आली आहे. यावरून त्यांनी हे प्रश्न उवस्थित केले आहेत.
X वर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, “एक एक व्यवस्था खिळखिळी होत चालली आहे, भाजप प्रवक्ते राहिलेली व्यक्ती आता मुंबई उच्च न्यायालयात न्यायामूर्ती होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनता आता न्याय कोणाकडे मागणार ?
ते म्हणाले की, “एका पक्षाच्या प्रवक्ता राहिलेली व्यक्ती न्यायमूर्ती म्हणून निष्पक्ष न्याय देणार का? न्यायमूर्ती पदावरील व्यक्तीकडून मोठ्या अपेक्षा असतात, असे असताना एका पक्षाच्या पदावर राहिलेली व्यक्ती न्यायदानाचे काम करताना त्यात पारदर्शकता ठेवेल का? हा खरा प्रश्न आहे. माननीय सरन्यायाधीश यांनी या नियुक्तीची दखल घ्यावी, महाराष्ट्राच्या निष्पक्ष न्यायालयाच्या इतिहासाला गालबोट लागू नये.”
भाजप प्रवक्ते पदावर राहिलेली व्यक्ती “न्यायाधीश” होणार असतील तर जनतेला न्याय मिळेल का? संविधानाचे रक्षण होईल का ?
एक एक व्यवस्था खिळखिळी होत चालली आहे, भाजप प्रवक्ते राहिलेली व्यक्ती आता मुंबई उच्च न्यायालयात न्यायामूर्ती होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनता आता… pic.twitter.com/vs0hyu7cpg
– विजय वाडेटीवार (@vijaywadettiwar) 5 ऑगस्ट, 2025
Comments are closed.