अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी; म्हणाले, येत्या 24 तासांत भारतावर…

डोनाल्ड ट्रम्प ऑन इंडिया टॅरिफ: भारतावर येत्या 24 तासांत वाढीव कर (Donald Trump On India Tarrif) लादणार असा थेट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिला आहे. भारताचा रशियासोबत सुरु असलेल्या व्यापारावरुन अमेरिका नाराज आहे. रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी सुरु असल्याने टॅरिफ वाढवण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भारतावर 25 टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त दंड आकारला जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत हा एक चांगला व्यापारी भागीदार नाही. भारत आमच्याबरोबर व्यापार करतो. मात्र, अमेरिका भारताबरोबर व्यापार करत नाही. भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता मला वाटतं की, पुढील 24 तासांत भारतावर आणखी जास्त टॅरिफ आकारावं. कारण भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे, म्हणजेच युद्ध यंत्रणेला इंधन देत आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

चीननंतर भारत हा तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार-

चीननंतर भारत हा जगातील सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे. भारत रशियाकडून त्याच्या गरजेच्या 35 टक्के तेल खरेदी करतो. अमेरिकेने यापूर्वीही रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावर भारताला धमकी दिली होती. दरम्यान, भारताला रशियाकडून सवलती मिळू शकतात. रशिया भारताला तेल खरेदीसाठी सूट देऊ शकतो.

भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर-

भारत सरकारने रशियाचंच उदाहरण देत ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलं होतं. ज्या रशियाचं नाव घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकावलं आहे, त्याच रशियाकडून अमेरिका व युरोपियन युनियन कच्चा माल आयात करत असल्याचा दाखला भारतानं दिला आहे.युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका व युरोपियन राष्ट्रे रशियाकडून तेल आयात करतो म्हणून भारतावर सातत्याने टीका करत आहेत. पण युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेलाचे उपलब्ध पुरवठा पर्याय हे युरोपकडे वळवण्यात आले. त्यामुळेच भारतानं रशियाकडून तेल आयात करायला सुरुवात केली, असं भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

India On Russia Oil: अमेरिका आणि युरोपचा भारताने काही तासात केला पर्दाफाश; रशियासोबतच्या व्यापार कराराचे सत्य केलं उघड!

Donald Trump : रशियाकडून तेल खरेदी करुन भारत मोठा नफा कमावतोय, त्यामुळे अजून मोठा टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

आणखी वाचा

Comments are closed.