वैभव सूर्यवंशीचा दमदार शाॅट, शूटिंग क्रूमध्ये पळापळ! थोडक्यात वाचला कॅमेरामॅन! पहा VIDEO

वैभव सूर्यावंशी व्हायरल शॉट व्हिडिओ: “बॉल बघ आणि मार”, हाच आहे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा साधा पण प्रभावी मंत्र. अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने त्याच्या शानदार फलंदाजीने देशांतर्गत क्रिकेट, भारताच्या अंडर-19 संघ आणि आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचे लक्ष वेधून घेतले आहे. अलीकडेच वैभव राजस्थान रॉयल्सच्या एका प्रमोशनल शूटचा भाग होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या एका रिपोर्टनुसार, शूटिंगदरम्यान एक अनपेक्षित घटना घडली. नेट्समध्ये फलंदाजी करताना वैभवच्या हेल्मेटवर एक ‘GoPro’ कॅमेरा होता आणि शूटिंग क्रू जवळच उपस्थित होता. (Rajasthan Royals promotional shoot)

एका चेंडूवर त्याने इतका जोरदार स्ट्रेट ड्राईव्ह मारला की, चेंडू थेट मागे असलेल्या क्रू मेंबर्सच्या दिशेने गेला. सर्वजण गोंधळून गेले, एका कॅमेरामॅनचा (Vaibhav Suryavanshi Direct Hit Shot in Camerman Direction) कॅमेरा हातातून सुटला आणि काही लोक तर खाली पडले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पण चेंडूचा वेग आणि वैभवची ताकद पाहून सगळेच थक्क झाले. वैभव स्वतःही थोडा घाबरला आणि लगेच माफी मागताना दिसला. तो म्हणाला, “सॉरी! माझा तसा हेतू नव्हता.”

वैभवची लोकप्रियता तेव्हा आणखी वाढली, जेव्हा त्याने आयपीएलच्या एका सामन्यात अवघ्या 35 चेंडूंमध्ये वादळी शतक झळकावले. त्यानंतर त्याची भारताच्या अंडर-19 संघासाठी इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. इंग्लंड दौऱ्यातही वैभवने उत्कृष्ट कामगिरी केली. पहिल्या सामन्यात त्याने 19 चेंडूंमध्ये 48 धावा केल्या. पुढील सामन्यांमध्येही त्याने वेगवान खेळी केल्या आणि एका सामन्यात 20 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले. पण तो इथेच थांबला नाही. त्यानंतर आणखी एका सामन्यात त्याने 52 चेंडूंमध्ये शतक ठोकून सर्वांनाच चकित केले. या संपूर्ण मालिकेत वैभवने 71च्या सरासरीने 355 धावा केल्या आणि तो मालिकेतील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. (Vaibhav Suryavanshi England tour)

Comments are closed.