'या' दिग्गजाच्या एका फोनमुळे यशस्वी जयस्वालने मुंबई संघ सोडण्याचा विचार सोडला! कोण आहे तो क्रिकेटर?

Yashasvi Jaiswal: भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने चमकदार कामगिरी केली. तो भारतीय कसोटी संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र, यशस्वी जयस्वालला देशांतर्गत क्रिकेटमधील मुंबई संघाला सोडून दुसऱ्या संघाकडून खेळायचे होते. पण, रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माच्या सांगण्यावरून त्याने आपला निर्णय बदलला. (Yashasvi Jaiswal Domestic Cricket)

यशस्वीने सुरुवातीपासूनच मुंबईसाठी एज-ग्रुप क्रिकेट खेळले आहे. (Yashasvi Jaiswal Mumbai Team) एका रिपोर्टनुसार, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) सचिवांनी सांगितले की, रोहित शर्माने यशस्वी जयस्वालला मुंबई संघातच राहण्यास सांगितले. रोहितने त्याला समजावले की, मुंबईसाठी खेळणे ही खूप मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे. कारण या संघाने 42 रणजी विजेतेपदे जिंकली आहेत. रोहितने यशस्वीला पुढे सांगितले की, “हे विसरू नकोस की मुंबईनेच तुला हे व्यासपीठ दिले, ज्यामुळे तू कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहेस.” (Rohit Sharma Advice)

Comments are closed.