दुलीप ट्रॉफीतही शुभमन गिल कर्णधार,उत्तर विभागाच्या संघाचे नेतृत्व करणार
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत राखल्यानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल आता 28 ऑगस्टपासून बंगळुरू येथे सुरू होणाऱया आगामी दुलीप ट्रॉफी स्पर्धेत उत्तर विभागाचे नेतृत्व करणार आहे. तसेच ओव्हल कसोटीत पंतऐवजी यष्टिरक्षण करणाऱया ध्रुव जुरेलकडे मध्य विभागाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.
दुलीप करंडकात हिंदुस्थानी क्रिकेटचे अनेक दिग्गज खेळणार असल्यामुळे या स्पर्धेचा दर्जा उंचावलेला आहे. यात फक्त रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, के. एल. राहुल या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याखेरीज इंग्लंड दौऱयात सहभागी झालेले सर्वच खेळाडू आपापल्या विभागीय संघांचे नेतृत्व करण्यासाठी उतरतील.
उत्तर विभागाच्या संघात अर्शदीप सिंग, अंशुल कंबोज आणि अष्टपैलू हर्षित राणा यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक संघात राखीव खेळाडूंचीही मोठी यादी तयार करण्यात आली आहे.
दुलीप ट्रॉफीत सहा विभागीय संघ
या वर्षी दुलीप ट्रॉफी पूर्वीप्रमाणे सहा विभागीय संघांच्या पारंपरिक स्वरूपात खेळवली जाणार आहे आणि ही स्पर्धा 2025-26 च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात ठरेल. उत्तर विभाग आपला पहिला सामना ईशान किशनच्या नेतृत्वाखालील पूर्व विभागाशी खेळणार आहे. हा सामना बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राऊंडवर होणार आहे. विजेता संघ उपांत्य फेरीत दक्षिण विभागाशी भिडेल तर मध्य विभाग आणि उत्तर पूर्व विभाग यांच्यातील विजेता संघ दक्षिण विभागाविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळेल.
उत्तर विभाग: शुबमन गिल (कर्नाधर), शुभम खजूरिया, अंकित कुमार (उपदेश), आयुष बडोनी, यश धुल, हर्षित राणा, अंकित काळसी, मयंक दागर, दिवेश शर्मा, निशुल पंबोसे कानहैया वडवान, अर्शादिप सिंग.
मध्यवर्ती विभाग: ध्रुव ज्युरेल (यशकर कर्नाधर), रजत पाटीदार, आर्यन जुयाल, डॅनिश मालावार, सांचित देसाई, कुल्दीप यादव, आदित्या ठाकरे, दीपक चार, सारांश जैन, समरी जैन, शूबहॅम शौश फर्मे.
पश्चिम विभाग संघ ः शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जैसवाल, आर्य देसाई, हार्विक देसाई, श्रेयस अय्यर, सरफराज़ खान, ऋतुराज गायकवाड, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवळे, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, धर्मेंद्र जाडेजा, तुषार देशपांडे, अरझान नागवासवाला.
पूर्व विभाग संघ ः ईशान किशन (कर्णधार व यष्टिरक्षक), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), संदीप पटनायक, विराट सिंग, डॅनिश दास, श्रीदम पॉल, शरणदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), रियान पराग, उत्कर्ष सिंग, मनीषी, सूरज जैसवाल, मुकेश कुमार, आकाश दीप, मोहम्मद शमी.
दक्षिण विभाग संघ ः तिलक वर्मा (कर्णधार), मोहम्मद अझरुद्दीन (उपकर्णधार), तन्मय अगरवाल, देवदत्त पडिक्कल, मोहित काळे, सलमान निझार, नारायण जगदीशन, टी. विजय, आर. साई किशोर, तनय त्यागराजन, वैशाक विजयकुमार, एम. डी. निधीश, रिकी भुई, बासिल एन. पी., गुरजापनीत सिंग, स्नेहल कवठणकर.
Comments are closed.