अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची हत्या; स्कूटी पार्किंगवरून वाद, दोघांनी मिळून केला धारदार शस्त

दिल्ली: दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीची निजामुद्दीन परिसरात हत्या करण्यात आली आहे. स्कूटी पार्किंगवरून झालेल्या छोट्या वादाचे रूपांतर हत्येत झाले. काल गुरुवारी (7 ऑगस्ट) रात्री 11:00 वाजताच्या सुमारास त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. निजामुद्दीनमधील पार्किंगवरून घडलेल्या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला. तपासानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

घराच्या दाराशी स्कूटर पार्क करण्यावरून वाद

पोलिसांच्या आतापर्यंतच्या निदर्शनास आलेल्या माहितीनुसार, रात्री आसिफ कुरेशी आणि काही लोकांमध्ये भांडण झाले होते. आसिफने आरोपींना घराच्या गेटबाहेर स्कूटर पार्क करू नका असे सांगितले होते, परंतु लोकांनी ऐकले नाही, त्यानंतर वाद सुरू झाला. या वादातून आरोपीने आसिफवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या हल्ल्यात आसिफ कुरेशी गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणावर रस्तस्त्राव झाला. गंभीर अवस्थेत त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आसिफ कुरेशीच्या पत्नीने काय म्हटले?

मृत आसिफ कुरेशीच्या पत्नीने सांगितले की, शेजारच्या एका मुलाने रात्री ९.३०-१०.०० च्या सुमारास घराबाहेर त्याची स्कूटर पार्क केली होती, त्यामुळे दरवाजा बंद झाला. आसिफ म्हणाला, बेटा, गाडी थोडी पुढे पार्क कर, पण तो मुलगा शिवीगाळ करू लागला आणि म्हणाला की तुला तिथं येऊन सांगतो. यानंतर, तो मुलगा वरून खाली आला आणि त्याने आसिफच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. त्याचा भाऊही त्याच्यासोबत आला. आसिफच्या छातीतून खूप रक्तस्त्राव होऊ लागला. त्याच्या पत्नीने ताबडतोब तिचा मेहुणा जावेद याला घरी बोलावले, पण तोपर्यंत आसिफचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, मृता आसिफ कुरेशीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की त्यांच्यात आणि त्या दोन भावांमध्ये यापूर्वीही पार्किंगवरून वाद झाला होता. यावेळी मात्र हा वाद वाढला, तर आसिफ कुरेशीच्या पत्नीने सांगितले की “माझा नवरा कामावरून घरी परतला तेव्हा शेजाऱ्याची स्कूटर आमच्या घरासमोर उभी होती, जी त्याने काढून टाकण्यास सांगितले. दोघांमध्ये वाद सुरू होताच, शेजाऱ्याने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि धारदार शस्त्राने त्याची हत्या केली”. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे आणि त्यांना आज (शुक्रवारी) न्यायालयात हजर केले जाईल. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. पोलिस मृताच्या कुटुंबातील इतर शेजाऱ्यांसह काही प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करत होते. पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा

Comments are closed.