रिलच्या नादात धबधब्याच्या टोकावरून सटकला; 70 फूट खोल दरीत कोसळला, मुंबईतील तरुणाचे आदिवासींनी वाचवले प्राण

करण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका तरुणाला ‘देव तारी त्याला कोण मारी’ या उक्तीचा प्रत्यय आला. रिल काढण्याच्या नादात या तरुणाचा पाय धबधब्याच्या टोकावरून निसटला आणि तिथून तो थेट 70 फूट खोल दरीत कोसळला. झाडाझुडपात अडकून पडलेल्या या तरुणाच्या विव्हळण्याचा आवाज ऐकून आदिवासी तरुणांनी त्याला शोधून काढले आणि सुखरूपपणे डोंगरावरून उतरवून भिवपुरी येथील रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मुंबईतील सुशांत तांडे हा 20 वर्षीय तरुण त्याच्या चार मित्रांसोबत आषाणे-कोषाणे या धबधब्यावर सहलीसाठी आला होता. सकाळी ट्रेनने भिवपुरी स्थानकात उतरल्यानंतर सर्व मित्र चालत धबधब्यावर गेले. तेथे मौजमस्ती केल्यानंतर सेल्फी आणि रिल काढण्याची चढाओढ सुरू झाली. सुशांत हा धबधब्याच्या टोकाकडे डोंगर चढून गेला. संध्याकाळी परतताना ओल्या मातीवरून त्याचा पाय घसरला आणि तो थेट 70 फूट खोल दरीत कोसळला, झाडाझुडपात अडकला त्यामुळे तो वाचला. त्याने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला.

संध्याकाळची वेळ त्यात प्रचंड पाऊस सुरू होता. जखमी अवस्थेत सुशांत विव्हळत होता. त्याचा आवाज ऐकून कामावरून आदिवासी वाड्यावर परतणाऱ्या तरुणांनी खोल दरीत कोसळलेल्या सुशांतचा शोध घेतला. झाडाझुडपातून त्याची सुखरूप सुटका केली. या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलाने कर्जत पोलिसांना दिल्यानंतर पोलीसही घटनास्थळी आले. स्थानिक तरुणांनी अत्यंत धाडसाने अंधारात दरीत उतरत सुशांतला भिवपुरी येथील रायगड रुग्णालयात दाखल केले.

Comments are closed.