Bedroom : बेडरूमचा मेकओव्हर करण्यासाठी टिप्स
आपले घर सुंदर आणि आकर्षक दिसावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. कोणाचं Rk असतं तर कोणाचे 1BHK, 2BHK असतं. घर छोटं असो वा मोठं प्रत्येकासाठी ते महत्त्वाचं आणि जवळचं असतं. BHK फ्लॅट असल्यावर किचन आणि बेडरुमचा समावेश असतो. घर आकर्षक दिसण्यासाठी विविध गोष्टी वापरल्या जातात. हॉलप्रमाणेच बेडरुम सजवण्यात देखील आवडीनूसार सजवला येतो. आज आपण बेडरूमचा मेकओव्हर करण्यासाठी काही सोपे हॅक्स जाणून घेणार आहोत. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊयात.
या हॅक्सचा करा वापर –
- बेडरुमचा रंग बदला. बेडरूम प्रशस्त आणि शांत दिसण्यासठी फिकट रंगाचा वापर करावा.
- तुमच्या बेडरूमला आधी गडद रंग असेल तर आता फिकट रंग लावावा. यामुळे बेडरुम नव्यासारखा दिसेल.
- बेडरुममधील पडदे आणि उशांची कव्हर्स बदलून खोलीला एक नवा लूक तुम्हाला देता येईल.
- बेडरुमच्या आकाराला अनुरूप फर्निचर निवडावे.
- कमी जागेत जास्त उपयोगी असलेले फर्निचर खरेदी करावे. जसे की, स्टोरेज बेड किंवा मल्टीफंक्शनल फर्निचर.
- फर्निचर ठेवताना खोलीत हवा खेळती राहील हे विचारात घ्या.
- बेडरूममध्ये अनावश्यक वस्तू ठेवल्या असतील तर त्या काढून टाका.
- बेडरूममध्ये नवी बेड खरेदी करण्याच्या विचारात असाल तर खोलीच्या आकारानुसार खरेदी करावा.
- बेड आणि भिंतीचा रंग एकमेकांशी जुळणारा हवा, हेही महत्त्वाचे आहे. यामुळे बेडरूमला एक नवा लूक मिळतो.
- बेडरुम आराम करण्याची जागा आहे. त्यामुळे येथे तेजस्वी प्रकाशाची सोय न करता मंद प्रकाश कसा राहील याची काळजी घ्यावी.
- सुंदर, मंद सुगंध बेडरुममध्ये दरवळण्यासाठी तुम्ही खरी फुले किंवा सुगंधित मेणबत्त्या ठेवू शकता.
- बेडरुममध्ये साइट टेबल नसेल तर खरेदी करा. यामुळे बेडरुमला नवा लूक मिळेल.
- बेडरुमसाठी बॉलपेपर, पेंटिग्ज, आरसे आकर्षक वापरावेत.
- झाडे ठेवून तुम्ही बेडरुमला नॅचरल लूक देऊ शकता.
- यासह छोट्या-छोट्या ऍक्सेसरीज, मेणबत्त्या, शोभेच्या वस्तू वापरून बेडरुमचा मेकओव्हर करता येईल.
हेही पाहा –
Comments are closed.